Breaking News

अजित पवार यांचे आदेश, नांदेड जिल्ह्यातील कामांच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करा जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठाच्या कामाचा अहवाल सादर करण्याचे आदेश

नांदेड जिल्ह्यातील भोकर, अर्धापूर, मुदखेड तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असणारी पाणीपुरवठा योजनांची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी या कामांना गती द्या. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत नांदेड जिल्ह्यात सुरु असणाऱ्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आज नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदार संघातील जलजीवन मिशनच्या व वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. या बैठकीला खासदार अशोक चव्हाण (दूरदृश्य प्रणालीद्वारे), नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव अभिषेक कृष्णा, दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत १२३४ कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तर २८ पाणीपुरवठा योजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत राबविण्यात येत आहेत. यामध्ये भोकर विधानसभा मतदार संघातील भोकर, अर्धापूर व मुदखेड तालुक्यात १२२ जिल्हा परिषदेच्या तर दोन योजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत सुरु आहेत. ही सुरु असणारी कामे विहित कालमर्यादेत पुर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी या कामांना गती द्यावी. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात सुरु असणाऱ्या कामांच्या सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *