Breaking News

अमित शाह म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्यांचा तिरंग्याखाली निवडणूका जम्मू काश्मीरला तीन कुटुंबानी लुटले

जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणूकांमधील सामन्यातील रंगत वाढत चाचली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या फारूख अब्दुला यांच्या नॅशनल काँन्फरन्सच्यावतीने प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. यासभेत बोलताना राहुल गांधी यांनी जम्मू आणि काश्मीर राज्याला पुन्हा एकदा राज्याचा दर्जा मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले.

या पार्श्वभूमीवर भाजपाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रचारसभा आयोजित करण्यात होती. या सभेत बोलताना जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्यांदाच तिंरग्याच्या झेंड्याखाली आणि कलम ३७० शिवाय निवडणूका पार पडत असल्याचे सांगत नॅशनल कॉन्फरन्स (NC) – काँग्रेस आघाडीवर फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांची सहानुभूती बाळगणाऱ्यांची सुटका करून जम्मू-काश्मीर अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला.

यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, एनसी आणि काँग्रेसला दगडफेक करणाऱ्यांना सोडायचे आहे. त्यांना राजौरी आणि पूंछमध्ये दहशतवाद वाढवायचा आहे. आम्ही त्रास देणाऱ्यांना तुरुंगात टाकले. त्यांना नियंत्रण रेषेवरील व्यापार पुन्हा सुरू करायचा आहे. त्याचा फायदा कोणाला होणार असा सवालही यावेळी उपस्थित केला.

तसेच पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) सोबत एनसी-काँग्रेस आघाडीने या प्रदेशाला “दहशतवादाच्या आगीत” ढकलण्याचा प्रयत्न सुरु केल्याचा आरोपही यावेळी केला.

अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, तीन कुटुंबांनी जम्मू-काश्मीरला लुटले आहे. एनसी आणि काँग्रेस सत्तेवर आल्यास दहशतवाद परत येईल. जम्मूला त्यांचे भवितव्य ठरवायचे आहे. जर भाजपा सत्तेवर आला तर आम्ही दहशतवादाला डोके वर काढू देणार नाही. जोपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत पुन्हा चर्चा सुरू होणार नाही असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, एनसी NC-काँग्रेस युतीचा उद्देश जम्मूला त्याचे हक्क हिरावून घेणे आणि प्रदेशासाठी स्वायत्तता पुन्हा आणणे आहे, जे त्याने कधीही होणार नाही असे वचन दिले होते. जम्मू आणि काश्मीरमधील स्वायत्ततेबद्दल आता कोणतीही शक्ती बोलण्याची हिंमत करणार नाही, असेही यावेळी सांगितले.

राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आश्वासन देऊन लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप अमित शाह यांनी करत पुढे म्हणाले की, राहुल गांधी म्हणतात की ते जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देणार आहेत. त्यांच्याकडे तसे करण्याचा अधिकार आहे का? मी संसदेत म्हटले आहे की निवडणुकांनंतर योग्य वेळी राज्याचा दर्जा दिला जाईल, जम्मू-काश्मीरच्या लोकांना मूर्ख बनवत आहे, राहुल गांधींनी थांबले पाहिजे असेही यावेळी सांगितले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *