Breaking News

अमित शाह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका, फूट पाडणाऱ्यांच्या मागे उभे राहुल गांधी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावरून केली टीका

काँग्रेस खासदार राहुल गांधी हे त्यांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान ‘भारतविरोधी’ आणि ‘देशविरोधी’ वक्तव्य करत असल्याबद्दल सडकून टीका करत राहुल गांधींनी “नेहमीच देशाच्या सुरक्षेला धोका दिला आहे आणि भावना दुखावल्या असल्याची टीका, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.

अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, देशात फूट पाडण्याचा कट रचणाऱ्या शक्तींच्या पाठीशी उभे राहणे आणि देशविरोधी वक्तव्ये करणे ही राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची सवय आहे. मग ते जेकेएनसी JKNC च्या राष्ट्रविरोधी आणि जम्मू आणि काश्मीर J&K मधील आरक्षणविरोधी अजेंड्याला पाठिंबा देत असेल किंवा भारतविरोधी विधाने करत असेल. परदेशी प्लॅटफॉर्मवर, राहुल गांधींनी नेहमीच देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण केला आहे आणि भावना दुखावल्या असल्याचे एक्सवर ट्विट करत आरोप केला.

राहुल गांधी यांच्या विधानाने प्रादेशिकता, धर्म आणि भाषिक भेदांच्या धर्तीवर तेढ निर्माण करण्याच्या काँग्रेसच्या राजकारणावरही यावेळी अमित शाह यांनी टीका केली.

केंद्रीय गृहमंत्र्यांनीही आरक्षणाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्यावर ताशेरे ओढताना म्हणाले की, देशातील आरक्षण संपुष्टात आणण्याचे बोलून राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आणला असल्याची टीका केली.

शेवटी अमित शाह आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, त्याच्या मनात जे विचार होते ते शब्दांच्या रूपात निघून गेले. मला राहुल गांधी यांना सांगायचे आहे की जोपर्यंत भाजपा आहे तोपर्यंत कोणीही आरक्षण रद्द करू शकत नाही किंवा देशाच्या सुरक्षेशी कोणी तडजोड करू शकत नाही असा इशाराही यावेळी दिला.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून तेथे एका विद्यापीठात मुलाखतीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी भारतातील राजकिय परिस्थितीवर राहुल गांधी यांनी भाष्य करताना म्हणाले की, इंडिया आघाडीत भाजपाकडून कोण-कोणत्या संस्थांवर त्यांची माणसं बसविली आहेत यावर सातत्याने आम्ही चर्चा केल्या. लोकसभा निवडणूकीच्या काळात ते मुद्देही आम्ही जनतेसमोर मांडलो. जनतेने आमच्याबाजूने कौल दिला. ज्या गोष्टीसाठी भाजपाने अनेक वर्षे काम केले. ते लोकसभा निवडणूकीच्या निकालाने एका ठराविक स्तराला ते भाजपाला थांबविण्यास भाग पाडले.

Check Also

महेश तपासे यांचा गौप्यस्फोट, भाजपाच शिंदे व अजित पवार यांचे उमेदवार पाडणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या बैठकीत निर्णय झाल्याचा दावा

राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कालावधी जवळजवळ येत आहे. त्यातच गणेशोत्सवाचा सणाचे औचित्य साधत भाजपाचे अनेक बडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *