Breaking News

अरविंद केजरीवाल जाता जाता म्हणाले, सर्व एक्झिट पोल बनावट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज तिहार तुरुंगात आत्मसर्मपण

दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जामीन मंजूर केला होता. तसेच २ जूनला तिहार तुरूंगात आत्मसमर्पण करण्याची अट जामीन देताना घातल होती. त्यानुसार अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरूंगात जाण्यासाठी घरातून दुपारी निघाले. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणूकीचे जे काही एक्झिट पोल जाहिर झाले. ते सर्व बनावट असल्याची टीका केल.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवित म्हणाले की, त्यांनी हुकूमशाहीविरोधात आवाज उठवल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांसमोर नियोजित आत्मसमर्पण करण्यापूर्वी दिल्लीतील आप मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या टर्मची भविष्यवाणी करणाऱ्या एक्झिट पोलला “बनावट” असल्याचे सांगत भाजपा ४ जूनला सत्तेत परत येणार नाही, असे ठामपणे सांगितले.

पुढे बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, मला दिल्लीतील जनतेला सांगायचे आहे – तुमचा मुलगा आज तुरुंगात परतत आहे. हे मी कोणत्याही भ्रष्टाचारात गुंतले आहे म्हणून नाही, तर मी हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवला आहे म्हणून. (लोकसभा निवडणुकीच्या) प्रचारादरम्यान, त्यांच्याकडे माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही हे पंतप्रधानांनी स्विकारले आहे, त्यांनी ५०० हून अधिक ठिकाणी छापे टाकले, परंतु एक पैसा मिळाला नसल्याचे सांगितले.

अरविंद केजरीवाल यांनी एक्झिट पोल “बनावट” हा असल्याच्या गोष्टीवर जोर देत म्हणाले की, याला मनाचा खेळ खेळण्याचा भाजपाचा डाव असल्याची खोचक टीका केली.

पुढे बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, हे सर्व एक्झिट पोल बनावट आहेत. एका एक्झिट पोलने राजस्थानमध्ये भाजपला ३३ जागा दिल्या, तर तिथे फक्त २५ जागा आहेत… खरा मुद्दा हा आहे की त्यांना मतमोजणीच्या ३ दिवस आधी बनावट एक्झिट पोल का करावा लागला. याबद्दल अनेक सिद्धांत आहेत, त्यापैकी एक म्हणजे ते (भाजपा) मशीन्स (ईव्हीएम) मध्ये फेरफार करण्याच्या प्रयत्न करत आहेत असा संशयही यावेळी व्यक्त केला.

आदल्या दिवशी केजरीवाल यांनी राजघाट येथील महात्मा गांधींच्या स्मारकाला आणि कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिराला भेट दिली. दिल्ली दारू धोरण प्रकरणात त्यांचा तीन आठवड्यांचा अंतरिम जामीन १ जून रोजी संपल्याने आप सुप्रिमोने दुपारी ३ च्या सुमारास तिहार तुरुंगासाठी त्यांचे निवासस्थान सोडले. वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन मागणाऱ्या केजरीवाल यांच्या याचिकेवर दिल्ली न्यायालयानेही ५ जूनपर्यंत स्थगिती दिली. .

एक्स X या मायक्रो ब्लॉगिंगवरील एका पोस्टमध्ये, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी २१ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभारी असल्याचे सांगितले.

तिहारच्या सूत्रांनी सांगितले की, केजरीवाल यांना तुरुंग क्रमांक 2 मध्ये ठेवण्यात येणार आहे. तुरुंगाच्या नियमानुसार कैद्याला सूर्यास्तापूर्वी अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण करावे लागते.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीदरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अनुपस्थितीत AAP नेत्यांमध्ये ऐक्य राखण्याच्या गरजेवर भर दिला.

एक्झिट पोलने लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय राजधानीत भाजपाने आणखी एक क्लीन स्वीपचा अंदाज वर्तवला असताना ही बैठक झाली. इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलने दिल्लीत भाजपाला ६-७ जागा आणि AAP-काँग्रेस आघाडीला ०-१ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

गेल्या आठवड्यात, आप प्रमुखांनी वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन सात दिवसांच्या वाढीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. केजरीवाल यांनी दावा केला की त्यांना चाचण्यांसाठी वेळ हवा होता कारण त्यांचे वजन कमी होत आहे आणि केटोनची पातळी जास्त आहे. तथापि, सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने त्याच्या याचिकेची त्वरित यादी करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी अंतरिम जामीनासाठी विशेष सीबीआय-ईडी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ५ जूनपर्यंत निकाल राखून ठेवला आहे.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *