Marathi e-Batmya

बच्चू कडू यांची स्पष्टोक्ती, मतदारसंघ शिवसेनेचा, अन् उमेदवार…

काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत राज्यात महायुतीला अवध्या १८ जागा मिळाल्या. या अठरा जागांना भाजपाचे धोरण कारणीभूत ठरल्याची चर्चा तेव्हापासून राज्याच्या राजकारणात आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाने नाशिकचा उमेदवार जाहिर केला म्हणून पुढील कोणताच उमेदवार शिवसेना शिंदे गटाने जाहिर करायचा नाही अशी बंधने भाजपाने शिवसेनेवर घातल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमरावतीची जागा शिवसेनेकडे असतानाही भाजपाने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहिर केली. तसेच नवनीत राणा या पडणार असल्याचा सर्व्हे असतानाही भाजपाने तो सर्व्हे चुकीचा असल्याचे सांगत शिंदे गटाला त्यांचा उमेदवार देण्यापासून परावृत केल्याचा किस्सा प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी सांगितला.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चु कडू यांनी मतदारसंघ शिवसेनेचा आणि हस्तक्षेप भाजपाचा होत राहिल्यानेच हाच हस्तक्षेप मारक ठरला आणि लोकसभा निवडणूकीत कमी जागा निवडूण आल्याचा आरोप केला.

महायुतीत सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या पक्षाबाबत बोलताना बच्चु कडू म्हणाले की, आगामी काळात अजित पवार गटाचे अर्ध्याहून अधिक आमदार हे शरद पवार यांच्या गटात जातील इतकेच काय स्वतः अजित पवार हे तिकडे दिसू शकतील असे सांगत त्यांना कोणी अडवलं नाही. शेवटी हे राजकारण आहे. कधी कोण कुणाच्या पारड्यात जाऊन बसेल कुणाबरोबर राहणार हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचे सांगितले.

राज्यात असलेल्या तीन पक्षाच्या युती सरकारमध्ये तीन पक्ष सहभागी आहेत. या तिन पक्षामुळे श्रेयवादाची लढाई तर होणारच असे बच्चू कडू यांनी सांगत भाजपा म्हणतंय लाडकी बहिण योजना आम्ही आणलीय, शिंदे गटाचे नेते ही योजना आम्हीच आणली, अजित पवार यांचा पक्षही म्हणतो योजना आम्ही आणली. पण ही योजना कोणी आणली हे तेच ठरवतील असेही यावेळी सांगितले.

Exit mobile version