Breaking News

बृजभूषण सरण सिंग यांच्या टीकेला बजरंग पुनियाचे प्रत्त्युतर, देशप्रेमाची मानसिकता… काँग्रेस पुरस्कृत आंदोलन असल्याची केली होता आरोप

कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी कुस्ती परिषदेचे अध्यक्ष बृजभूषण सरण सिंग यांच्याकडून करण्यात येत असलेल्या लैगिंक शोषणाच्या विरोधात आवाज उठविला. तसेच बृजभूषण सरण सिंग यांच्यावर कारवाई करावी म्हणून दिल्लीच्या रस्त्यावर आंदोलनही केले. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत शेवटच्या क्षणी अपात्र ठरविण्यात आल्यानंतर परतलेल्या विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशावरून भाजपाचे माजी खासदार बृजभूषण सरण सिंग यांनी विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्याबरोबर काँग्रेसवरही टीका केली. या टीकेला कुस्ती पटू बजरंग पुनिया यांनी तितक्याच कडक भाषेत बृजभूषण सरण सिंग यांना प्रत्युत्तर दिले.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बजरंग पुनियाने बृजभूषण सरण सिंग यांनी केलेल्या टीकेवर बोलताना म्हणाले की, यावरून ब्रिजभूषण सिंग यांची देशाप्रती असलेली मानसिकता समोर आली आहे. हे विनेशचे पदक नव्हते. ते १४० कोटी भारतीयांचे पदक होते. आणि तिला गमावल्याचा आनंद होत नाही.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगट ज्या प्रकारे पदकावर पराभूत झाली ती राष्ट्रीय दु:खाची बाब होती, परंतु भाजपाच्या आयटी सेलने तिची खिल्ली उडवण्याची मोहीम चालवली, असा आरोपही बजरंग पुनिया यांनी केला.

बजरंग पुनिया पुढे बोलताना म्हणाला की, ज्यांनी विनेशच्या अपात्रतेचा आनंद साजरा केला, ते देशभक्त आहेत का? आम्ही लहानपणापासून देशासाठी लढत आहोत, आणि ते आम्हाला देशभक्ती शिकवण्याचे धाडस करतात. ते मुलींची छेडछाड करतात, असा आरोपही यावेळी केला.
अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केलेल्या बृजभूषण सरण सिंग यांनी दावा केला होता की फोगटने ऑलिम्पिक पदकाची संधी गमावली कारण “देवाने तिला शिक्षा केली.

फोगट आणि पुनिया काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या प्रतिक्रियेत, सिंग यांनी आरोप केला की फोगटने ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्या कुस्तीपटूची जागा चुकीच्या पद्धतीने घेऊन “फसवणूक” केली.

“चाचण्यांमध्ये पराभूत झालेल्या मुलीचे स्थान घेऊन ती ऑलिम्पिकमध्ये गेली. त्यामुळे तिच्यासोबत जे काही घडले ते न्याय्य होते आणि ती त्यास पात्र होती,” तो म्हणाला.

पुढे बोलताना बजरंग पुनिया म्हणाले की, लैंगिक छळाच्या प्रकरणाच्या संदर्भात फोगटचे नाव घेऊन त्याने गुन्हा केला आहे आणि त्याने तिचा विनयभंग केला असेल तर तिने त्याला थोबाडीत मारायला हवी होती. आम्ही कधीच सांगितले नाही की कोणत्या पैलवानाचा विनयभंग झाला. त्याने विनेशचे नाव घेऊन गुन्हा केला. मुलींमध्ये हिंमत असते तर. तेव्हा तुला थप्पड मारण्यासाठी, तुला अनेक वेळा थप्पड मारली गेली असती असेही यावेळी सांगितले.

बजरंग पुनिया यांनी भाजपवार बृजभूषण सरण सिंग यांना संरक्षण देण्याचा आणि माजी डब्ल्यूएफआय प्रमुखांविरुद्ध बोलणाऱ्या कुस्तीपटूंना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय एजन्सीचा वापर केल्याचा आरोपही केला. बृजभूषण सरण सिंग हे इतिहासातील एकपात्र असून ज्यावर चोरीपासून देशद्रोहापर्यंतचे आरोप आहेत. भाजपा त्याला पाठिंबा देत आहे. मला आता पंतप्रधान मोदींकडून कोणतीही आशा नाही. माझ्याविरुद्ध एजन्सींचा वापर करण्यात आला; डोपच्या आरोपाखाली माझ्यावर बंदी घालण्यात आली होती. मला कुस्ती फेडरेशनच्या WFI अध्यक्षांकडून कोणतीही अपेक्षा नसल्याचेही यावेळी सांगितले.

काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा निर्णयावर भूमिका स्पष्ट करताना बजरंग पुनिया म्हणाले की, पक्षाने कठीण काळात कुस्तीगीरांना साथ दिली. त्यांनी काँग्रेस, आप आणि इतर विरोधी पक्षांना त्यांच्या निषेधादरम्यान त्यांच्यासोबत राहिले. मी हरियाणा विधानसभा निवडणुकीत लढत नाही, असे सांगून मी फक्त एक कुस्तीपटू असून विनेश फोगट राजकारणात उतरेल. त्यांना राज्यसभेवर उमेदवारी द्यायची की नाही याबाबत पक्षाकडून निर्णय घेण्यात येणार आहे.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *