Breaking News

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सी पी राधाकृष्णन तर हरिभाऊ बागडे राज्यस्थानचे राज्यपाल रमेश बैस पदमुक्त की ?

पंजाब मधील आम आदमी पार्टी सरकारशी संघर्षाची भूमिका घेण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने दोन वेळा चपराक लगावलेले राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बरीच महिने हे पंजाब राज्यपाल पद रिक्त राहिले होते. अखेर या रिक्त जागेसह केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार राज्यपाल पदावर आज राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांनी नव्याने काही राज्यपालांची नियुक्ती केली.

महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल रमेश बैस यांनी पदावर नियुक्ती झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून राज्य सरकारच्या पैशातून स्वतःबरोबर शपथविधी सोहळ्यासाठी बोलावलेल्या गणगोत, मित्र परिवारांच्या विमानाचा खर्च, त्यांच्या हिंडण्याफिरण्याचा खर्च केल्याचे वृत्त मराठी ई-बातम्यानेच उघडकीस आणले होते. त्यास एक वर्षाचा कालावधी झाल्यानंतर अखेर राज्यपाल रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून मुक्त केले. आता रमेश बैस यांच्या जागेवर तेलंगणाचा प्रभारी राज्यपाल पदाची जबाबदारी असलेले सी पी राधाकृष्णन यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्त केले आहे.

याशिवाय राज्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना भाजपाने थेट बढती देत राजस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे आमदार हरिभाऊ बागडे हे २०१४ सालापासून भाजपा सरकार राज्यात आल्यानंतर २०१९ पर्यत विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर २०२०-२१ ला पुन्हा राज्यात भाजपाच्या प्रयत्नातून सरकार स्थानापन्न झाल्यानंतर हरिभाऊ बागडे यांचे प्रमोशन भाजपाकडून देण्यात आले नव्हते. मात्र आता त्यांच्यावर राज्यस्थानच्या राज्यपाल पदाची सोपविली.

तेलंगनाच्या राज्यपाल पदी जैशू देव वर्मा यांची नियुक्ती करम्यात आली आहे. तर ओमप्रकाश माथुर यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय कामगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांच्याकडे झारखंडच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. तर छत्तीसगडच्या राज्यपाल पदी रमेश देखा यांची नियुक्ती केली. मेगालयाच्या राज्यपाल पदी सी एच विजयशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी सी पी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बनवारीलाल पुरोहित यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या पंजाबच्या राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदिगडच्या प्रशासक पदी गुलाब चंद कटारिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची आसामच्या राज्यपाल पदासह मणिपूरच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या सर्वांचा कार्यकाल राज्यपाल पदाचा कार्यभार स्विकारल्याच्या तारखेपासून सुरु होणार आहे.

Check Also

महाराष्ट्रातील वीज खरेदीचे कंत्राट अदानीला; जयराम रमेश यांचे पाच प्रश्न जयराम रमेश यांचा आरोप, पराभवाच्या छायेखाली असतानाही कंत्राट अदानीलाच

राज्याच्या ऊर्जा विभागाने नुकतेच वीच खरेदी संदर्भात निविदा काढली होती. मात्र हि निविदा अदानीलाच मिळावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *