Breaking News

हिंदू नव वर्षारंभांचे निमित्त साधत मुख्यमंत्री शिंदेंनी दिले “मनसे” संकेत गुढी पाडव्यानिमित्त डोंबिवलीत मनसे कार्यालयाला दिली भेट

हिंदूत्वाचा नारा देत राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर आलेल्या पहिल्याच गुढी पाडवा सणानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी आज अचानक मनसे कार्यालयाला भेट दिली. त्यामळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करणार असल्याचे मनसे संकेत तर नाही ना अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे. विशेष म्हणजे आज गुढी पाडव्यानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे हे दादर येथील शिवाजी पार्क येथे आज मेळावा आयोजित केला आहे. त्यामुळे ही मनसे भेट, युतीत कधी अधिकृत जाहिर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली येथील मनसे मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. राज ठाकरेंच्या सभेच्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी मनसे कार्यालयाला भेट दिल्याने आज मनसे-शिंदे गट युतीची घोषणा होणार का? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे कार्यालयाला भेट दिल्यानंतर, मनसे-शिंदे गटामध्ये मनं जुळली का? असा प्रश्न विचारल्यानंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उत्तर दिताना म्हणाले, मनं जुळली किंवा मतं जुळली का? हे सगळं आमचे पक्षप्रमुख राज ठाकरे ठरवतील, अशी प्रतिक्रिया राजू पाटील यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत अधिक माहिती देताना राजू पाटील म्हणाले, आज पहिल्यांदा गणपती संस्थानच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले होते. त्यावेळी मीही तिथेच होतो. त्यांना मी विनंती केली की मनसेचं कार्यालय बाजुलाच आहे, येता का? यानंतर मुख्यमंत्र्यांनी काहीही वेळ न दवडता त्यांनी आमच्या विनंतीला मान देत मनसे कार्यालयाला भेट दिली. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. दिवसांतील २४ तास आणि वर्षातील १२ महिने कुणीही राजकारण करत नाही. काही गोष्टी संस्कृतीच्या आणि सामाजिक सलोख्याच्या असतात. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री मनसे कार्यालयात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत