Breaking News

सीआयएसएफच्या महिला सुरक्षा कर्मचारीने कंगना राणौत यांच्या श्रीमुखात भडकावली शेतकरी आंदोलनाबाबत चुकीचे वक्तव्य केल्यावरून मारली

चंदीगड विमानतळावर सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अभिनेता-राजकारणी बनलेल्या खासदार कंगना राणौतने यांच्या श्रीमुखात लगावल्याचा आरोप केला. साहिबजादा अजितसिंग नगर जिल्हा (मोहाली) पोलिसांनी द हिंदूला पुष्टी केली की कंगणा राणौत आणि सीआयएसएफ कर्मचाऱ्यांमध्ये संघर्षाची घटना घडली.

सदर सीआयएसएफने कॉन्स्टेबलला निलंबित केले आहे. सीआयएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की ते कॉन्स्टेबलविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा विचार करत आहेत.

संघर्षाची घटना आमच्या माहितीत आली आहे, तथापि, सीआयएसएफ त्यांच्या स्तरावर या प्रकरणाची चौकशी करत आहे. आमच्याकडे तक्रार आलेली नाही. आम्हाला तक्रार प्राप्त होताच, आम्ही गुणवत्तेनुसार त्यावर विचार करू, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर कंगणा राणौत यांच्यावर हल्ला झाला. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणौत जवळचा काँग्रेस प्रतिस्पर्धी विक्रमादित्य सिंग यांचा ७४००० मतांनी पराभव केला.

कंगना राणौत यांनी “X” एक्स वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये घटनेनंतर म्हणाल्या “… ही घटना चंदीगड विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान घडली. मी सुरक्षा तपासणी करत असताना, शेजारच्या केबिनमधील महिला सीआयएसएफ CISF महिला अधिकारी माझ्याजवळ आली आणि तीने मला मारहाण केली आणि शिवीगाळ केली. मी तिला विचारले की तिने असे का केले, त्यावर तिने उत्तर दिले की तिने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मी सुरक्षित आहे, पण पंजाबमधील वाढत्या दहशतवादाचा सामना कसा करायचा, ही माझी चिंता आहे.

https://x.com/KanganaTeam/status/1798697545201569904

एक्स X वर पोस्ट केलेल्या “पंजाबमधील दहशतवाद आणि हिंसाचारात धक्कादायक वाढ” या शीर्षकाच्या व्हिडिओ निवेदनात तिने सांगितले की ती सुरक्षित आणि ठीक आहे परंतु पंजाबमध्ये वाढत्या दहशतवादाबद्दल चिंतित आहे.

दरम्यान, सदर सुरक्षा महिला कर्मचाऱ्याने तिथे विमानतळावरच अन्य ठिकाणी आलेल्याचे सांगत म्हणाल्या की, माझी आई शेतकरी आंदोलनात सहभागी होती. त्यावेळी या महिलेने शेतकरी आंदोलनाबाबत चुकीचे वक्तव्य केले. त्यामुळे मी तिच्या श्रीमुखात लगावल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओत दुसऱ्या प्रवाशी व्यक्तींना सांगत होती.

https://x.com/zoo_bear/status/1798704338145046691

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *