Breaking News

तरविंदरसिंह मारवा व भाजपाविरोधात काँग्रेसचे शुक्रवारी राज्यभर आंदोलन राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणा-या तरविंदरसिह च्या निषेधार्थ

लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे बळी घेतले आहेत.आता पुन्हा गांधी संपवण्याची जाहीर धमकी दिली जात आहे व भाजपाचे सरकार मात्र त्यावर काहीही कारवाई करत नाही हे अत्यंत गंभीर व आक्षेपार्ह आहे. राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा भाजप नेता तरविंदरसिंह मारवा आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उद्या शुक्रवार १३ सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्ष राज्यभर तीव्र आंदोलन करून भाजपा सरकारचा धिक्कार करणार आहे.

खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपाचा माजी आमदार तरविंदरसिंह मारवा व भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी उद्या सकाळी ११ वाजेपासून तीव्र आंदोलन करुन या विकृत्तीविरोधात निषेध नोंदवाला जाणार आहे. भाजपाचा माजी आमदार तरविंदर सिंह मारवाच्या अटकेची मागणीही केली जाणार आहे अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष, संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.

Check Also

महेश तपासे यांचा गौप्यस्फोट, भाजपाच शिंदे व अजित पवार यांचे उमेदवार पाडणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या बैठकीत निर्णय झाल्याचा दावा

राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कालावधी जवळजवळ येत आहे. त्यातच गणेशोत्सवाचा सणाचे औचित्य साधत भाजपाचे अनेक बडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *