Breaking News

मनिष सिसोदीयांची कवितेतून जनतेला साद तर मोदींवर टीकास्त्र,… तो चौथी पास राजा का,… समाज माध्यमातून भरलेच व्हायरल

दिल्लीच्या दारू धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी राजधानी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया सध्या तुरुंगात आहेत. मनिष सिसोदिया यांनी तुरुंगातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. एका चौथी पास राजाच्या राजमहलचा (राजमहाल) पाया हादरत आहे असा खोचक टोला त्यांनी एका कवितेतून लगावला आहे.

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया सध्या तुरुंगात आहेत. तुरुंगातूनच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्रातून चपराक लगावली आहे. ते पत्रात म्हणतात की,

अगर, हर गरीब को मिली किताब तो,
नफरत की आंधी कौन फैलाए‌गा।
सबके हाथों को मिल गया काम,
तो सड़कों पर तलवारें कौन लहराएगा।
अगर पद गया, हर गरीब का बच्चा
तो चौथी पास राजा का, राजमहल हिल जाएगा ॥

अगर हर किसी को मिल गई अच्छी शिक्षा और समझ :
तो इनका whatsapp का विश्वविद्यालय बंद हो जाएगा।
पढ़े लिखे और समझदारी की बुनियाद पर खड़े समाज को,
कोई कैसे, कोणी नफरत के माया जाल में फंसाएगा ।।
अगर पढ़ गया एक-एक गरीब का बच्चा
तो चौथी पास राजा का राजमहल हिल जाएगा।

अगर पढ़ गया समाज का हर बच्चा,
तो तुम्हारी चालाकियों और कुनीतियों पे सवाल उठाएगा।
अगर गरीब को मिली कलम की ताकत,
तो वो अपने ‘मन की बात’ सुनाएगा। अगर पढ़ गया एक एक गरीब का बच्चा,
तो चौथी पास राजा का, राजमहल हिल जाएगा ||

दिल्ली और पंजाब के स्कूलों में हो रहा शेखनाद.
पूरे भारत में अच्छे शिक्षा की अलख जगाएगा।
जेल भेजो या फाँसी दे दो, ये कारवां रक नहीं पाएगा,
अगर पढ़ गया हर गरीब का बच्चा, राजमहल तुम्हारा दिन जाएगा।.

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, बुची बाबू, अर्जुन पांडे आणि अमनदीप धल्ल यांच्याविरोधातील सीबीआयच्या आरोपपत्रावरील आदेश राखून ठेवले आहेत. २७ मे रोजी न्यायालय आपला निकाल देणार आहे. पुरवणी आरोपपत्र २५ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. ईडीने सिसोदिया यांच्याविरोधात दाखल केलेल्या पाचव्या आरोपपत्रावरही सुनावणी होणार आहे. याआधी १० मे रोजी साऊथ अॅव्हेन्यू न्यायालयातील खटल्याची सुनावणी १९ मेपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *