Marathi e-Batmya

पुन्हा “लेवल प्लेईंग फिल्ड” निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेबाबत चुप्पी

मागील काही दिवसांपासून मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून ते गल्लीबोळात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत एकच चर्चा करत राज्यातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता कधी असा सवाल सातत्याने उपस्थित करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तिन्ही आयुक्तांनी आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता आणि किती टप्प्यात घेणार याचा निर्णय सर्वात आधी प्रसारमाध्यमांना सांगणार असल्याचे सांगत राज्यातील विधानसभेच्या निवडणूका कधी जाहिर करणार याचे उत्तर गुलदस्त्यातच ठेवल्याचे दिसून आले.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी लोकसभा निवडणूकीप्रमाणे पुन्हा एकदा लेव्हल प्लेईंग फिल्डनुसार कोणत्याही “राजकिय पक्षाला” पाठीशी घालणार नसल्याचे सांगत सर्व राजकिय पक्षांनासंधी देणार असून निवडणूकीत वाटप करण्यात येणाऱ्या सर्व राजकीय पक्षांकडून वाटप करण्यात येणाऱ्या मोफत वस्तू पैसे यावर कडक लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच लोकसभा निवडणूकीप्रमाणे घरोघरी जावून ज्येष्ठ नागरिकांचे मतदान घेणार असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, या निवडणूकीत आयोगाकडून सर्वात प्रथम क्रमांकावर आम्ही तरूण मतदारांवर फोकस ठेवला असून हा तरूण वर्गच भविष्यातील लोकशाही टीकवून ठेवण्यासाठी त्यांचा सहभाग वाढविण्यावर आयोगाकडून भर राहणार आहे. तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीसाठी माझे मतदान माझी लोकशाही हे घोषववाक्य राबविण्यात येत असल्याचेही यावेळी सांगितले.

यावेळी काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीवकुमार यांना सवाल केला की, राज्याती निवडणूका एका टप्प्यात घेणार की, दोन टप्पात, तसेच काही राजकिय पक्षांकडून पक्षाच्या प्रचारासाठी जे थीम साँग तयार करण्यात येते त्याबाबत काही मार्गदर्शक तत्वे जाहिर करणार आहात का आणि शरद पवार आणि अजित पवार गटातील निवडणूक चिन्हाबाबत कोणता निर्णय घेतला असे प्रश्न उपस्थित केले.

मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, थीम साँग्जबाबत नेमके काय आहे याची माहिती मी घेतो आणि त्यानंतर राज्यातील राजकिय पक्षाच्या थीम साँग्जबाबत निर्णय घेणार असल्याचेही यावेळी सांगत शरद पवार आणि अजित पवार पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत कोणतेही भाष्य करण्याचे टाळले. तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूका एका टप्प्यात घेणार की दोन टप्प्यात घेणार यासदंर्भातील निर्णय सर्वात आधी फक्त प्रसारमाध्यमांना सांगू असे सांगत प्रसारमाध्यमाच्या प्रश्नाची अप्रत्यक्ष खिल्लीही उडविली.

Exit mobile version