Marathi e-Batmya

जगन रेड्डी यांचा पलटवार, एन चंद्रबाबू नायडू खोटारडे…

मागील काही दिवसांपासून आंध्र प्रदेशातील तिरूमला तिरूपती देवस्थानातील लाडू बनविण्याच्या कामात भेसळ केली जात असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी करत याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन रेड्डी यांच्यावर आरोप केला. या आरोपानंतर एकच खळबळ निर्माण झाली. त्यानंतर आज वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्यावर तिरुपती मंदिरातील प्रसादात भेसळ केल्याचा आरोप करणाऱ्यांवरच कारवाई करण्याची विनंती केली.

जगन रेड्डी आपल्या पत्रात म्हणाले की, माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की नायडूच्या “बेपर्वा” आणि “राजकीयदृष्ट्या प्रेरित” विधानांमुळे भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) बोर्डाचे “पावित्र्य कलंकित” झाले आहे.
जगन रेड्डी यांनी पत्रात म्हटले आहे की, भगवान व्यंकटेश्वराचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात कोट्यवधी हिंदू भक्त आहेत आणि जर ही नाजूक परिस्थिती काळजीपूर्वक हाताळली नाही, तर या खोट्या गोष्टींमुळे एक व्यापक वेदना होऊ शकते आणि विविध आघाड्यांवर दूरगामी परिणाम होऊ शकतात, असा इशाराही यावेळी दिला.

जगन रेड्डी पुढे आवाहन करताना म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी “सत्य समोर आणून, भक्तांचा विश्वास पुन्हा स्थापित करावा असे आवाहन करत हे खरोखरच राजकीय हेतूने पसरवलेले खोटे आहे आणि या खोट्या प्रचारामुळे जगभरातील हिंदू भाविकांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. टीटीडी एक स्वतंत्र मंडळ आहे, ज्यामध्ये “विविध पार्श्वभूमीतील प्रतिष्ठित भक्त” आणि केंद्रीय मंत्री आणि इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शिफारस केलेल्या इतरांचा समावेश असल्याचेही यावेळी सांगितले.

जगन रेड्डी पुढे म्हणाले की, हे लक्षात घेण्याजोगे आहे की टीटीडी TTD बोर्डाचे काही वर्तमान सदस्य देखील भाजपाशी संलग्न आहेत. टीटीडी TTD च्या प्रशासनावर देखरेख ठेवण्याचा अधिकार विश्वस्त मंडळाकडे आहे आणि आंध्र प्रदेश राज्य सरकारची यात फारशी भूमिका नाही. तिरुमला व्यंकटेश्वर मंदिराच्या कारभाराचे व्यवस्थापन, आहे. मंदिरातील लाडूसाठी देण्यात येणाऱ्या तुपाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी व्यापक अनुपालन तपासणी केली जात असल्याचेही यावेळी सांगितले.

जगन रेड्डी पुढे पत्रात म्हणाले की, कठोर ई-निविदा प्रक्रिया, एनएबीएल NABL-मान्यताप्राप्त प्रयोगशाळा चाचण्या आणि कोणत्याही सामग्रीचा वापर करण्यापूर्वी बहु-स्तरीय तपासण्या केल्या जातात, हे अधोरेखित करून तेलुगू देसम पक्षाच्या राजवटीच्या मागील कार्यकाळातही अशाच प्रकारचे उपाय केले गेले होते. तुपाचा दर्जा निकृष्ट असल्याचे आढळून आल्याने टँकर नाकारण्यात आल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी घडली असल्याचेही यावेळी सांगितले.

एन चंद्राबाबू नायडू यांच्यावर टीका करताना जगन रेड्डी म्हणाले की, एक जबाबदार मुख्यमंत्र्याने खरे तर, टीटीडी TTD च्या कार्यपद्धतीच्या पावित्र्याबद्दल त्यांना दिलासा देण्यासाठी चेक आणि बॅलन्सची गरज जनतेच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चंद्राबाबू नायडू ज्या पद्धतीने वागले ते सामाजिक जबाबदारीपासून पूर्णपणे वंचित रीतीने वागल्याचा आरोपही यावेळी केला.

Exit mobile version