Breaking News

जयंत पाटील यांची इशारा, तर एमपीएससी लाही भ्रष्टाचार, पेपरफुटीची… राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली भीती

एमपीएससीत सरकारी हस्तक्षेप वाढत असल्याने एमपीएससीची स्वायत्तता धोक्यात असल्याचे वृत काही वर्तमान पत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारी हस्तक्षेप वाढल्याने एमपीएससी MPSC लाही भ्रष्टाचार, पेपरफुटीची कीड लागेल अशी भीती व्यक्त केली.

जयंत पाटील यांनी आपल्या एक्स हँडलवरून ही प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, आधी एमपीएससी MPSC परीक्षांमध्ये होणारा घोळ, आता अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने एमपीएससीत MPSC होणाऱ्या सरकारी हस्तक्षेपाची तक्रार. या दोन्ही बाबी अत्यंत चिंताजनक आहे. एमपीएससी MPSC परीक्षांसाठी सामान्य, गोरगरीब, होतकरू मुले प्रचंड मेहनत घेत असतात. या सरकारचे आतापर्यंतचे ‘काळे कारनामे’ पाहता, सरकारी हस्तक्षेप वाढल्याने एमपीएससी MPSC लाही भ्रष्टाचार, पेपरफुटीची कीड लागण्याची भीती आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार ग्राह्य धरून एमपीएससी MPSC ची स्वायत्तता अबाधित ठेवली पाहिजे. एमपीएससी MPSC जर स्वतःची स्वायत्तता टिकवून ठेवू शकत नसेल तर मुलांच्या भविष्याचे तरी रक्षण कसं करेल, असा सवालही यावेळी उपस्थित केला.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, महिला व बाल कल्याण विभागाकडून नुकतीच एक आदेश जारी करत ११४५ रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याचे आदेश दिले. तसेच हे कंत्राटी कर्मचारी ब्रिक्स इंडिया प्रा.लि. कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. याच कंपनीला शिक्षण विभागाने नियम डावलून वैद्यकिय शिक्षण विभागात कंत्राटी पध्दतीने भरतीचे काम दिले होते. या निमित्ताने ही कंपनी कोणाची आहे, हा कंत्राटदार कोणाचा लाडका आहे असा सवाल उपस्थित करत याचे उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला मिळाले पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *