Breaking News

लोकसभा निवडणूकीच्या निकालात इंडिया आघाडीने एनडीएचा कल तोडला अनेक राज्यात एनडीए पिछाडीवर, उत्तर प्रदेशात मोदींचा लीड घटला

लोकसभा निवडणूक २०२४ साठी सात टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर जाहिर करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपा प्रणित एनडीए आघाडीला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तसेच तिसऱ्यांदा भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए बहुमतात येईल आणि पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा विराजमान होतील असाही अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र लोकसभा निवडणूकीची मतमोजणीला सुरुवात होताच दुपारपर्यंत देशातील भाजपाप्रणित एनडीएच्या जागा कमी होताना दिसत आहेत. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी केंद्रातील सत्ता काबीज करण्याच्यादृष्टीने घौडदौड सुरु असल्याचे दिसून येऊ लागले.

वाराणसीमध्ये पहिल्यांदाच काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अजय राय यांच्या रूपाने उमेदवार दिला. सुरुवातीला काही फेऱ्यांमध्ये काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांनी मतमोजणीत चांगलीच लढत दिली. त्यामुळे नरेंद्र मोदी हे पिछाडीवर असल्याचे दिसून येऊ लागले होते. मात्र दुपारी १२ नंतर नरेंद्र मोदी हे मतांच्या आघाडीत पुढे गेल्याचे दिसून आले. वाराणसीमध्ये १ लाख ३२ हजार २०५ मतांनी आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार अजय राय हे ३ लाख ५० हजार ३३३ मते मिळाली आहेत.

तर अमेठी लोकसभा मतदारसंघातून स्मृती इराणी यांच्या विरोधात काँग्रेसचे किशोरी लाल यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल यांना २ लाख ९६ हजार ८५२ इतकी मते मिळाली तर भाजपाच्या स्मृती इराणी यांना २ लाख १४ हजार २७३ मते मिळाली. या दोघांच्या मतांची आकडेवारी पाहिली तर काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल यांना ८२ हजार ५७९ मतांनी आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

तसेच रायबरेलीतून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी पहिल्यांदाच काँग्रेसने उमेदवारी दिली होती. तसेच रायबरेली लोकसभा मतदारसंघ हा गांधी घराण्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. या मतदारसंघातून राहुल गांधी यांना २ लाख ६२ हजार १०८ मतांची आघाडी मिळाली आहे. तर राहुल गांधी यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे दिनेश प्रताप सिंग हे तितक्याच मतांनी पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

मागील लोकसभेच्या दोन्ही निवडणूकीत उत्तर प्रदेशातून सलग भाजपाला मतांचे भरघोस दान मिळाले होते. त्यामुळे केंद्रात सत्ता स्थापन करण्यात भाजपाला सहज सोपे झाले होते. मात्र उत्तर प्रदेशात काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीतील सहभागी पक्ष आणि उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीला यावेळी तेथील मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे दिसून आले. त्यामुळे उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीला ३७ जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसून येत आहे. तर भाजपाला ३२ जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसून आले. काँग्रेसला ७ जागांवर आघाडीवर राष्ट्रीय लोकदलाला २ जागांवर आघाडी, अपना दलला १ आणि आघाडी असल्याचे दिसून येत आहे.

राजस्थानमध्येही भाजपाला १४ जागांवर आघाडी असल्याचे दिसून येत आहे. तर काँग्रेस पक्षाला ८ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राजस्थानमध्येही इंडिया आघाडीच्या बाजून काही प्रमाणात कल असल्याचे दिसून आले. तर केरळमध्ये काँग्रेसने कम्युनिस्ट पार्टीच्या अनेक उमेदवारांचा पराभव करत १४ जागांवर आघाडी मिळवली असल्याचे दिसून येत आहे. वायनाड येथूनही राहुल गांधी यांना ३ लाख मतांची आघाडी मिळाल्याचे दिसून येत आहे. तर केरळ राज्यात भाजपा एका जागेवर आघाडीवर आहे.

तर बिहारमध्ये नितीशकुमार जनता दल संयुक्तला १४ जागांवर आघाडी असल्याचे दिसून येत आहे. तर भाजपाला १३ जागांवर आघाडी असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय लालू प्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दल फक्त ३ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. तर स छत्तीसगडमध्ये भाजपाला ११ जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसून येत आहे. तर काँग्रेसला फक्त एका जागेवर आघाडी मिळाल्याचे दिसून येत आहे. गुजरातमध्येही २४ जागांवर भाजपाला आघाडी असल्याचे तर १ जागेवर काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

झारखंडमध्ये १४ लोकसभेच्या जागा असून यापैकी ८ जागी भाजपा आघाडीवर आहे. तर झारखंड मुक्ती मोर्चाच्या ३ जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेसला २ जागांवर आघाडी असल्याची माहिती पुढे आली आहे. तर कर्नाटक राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे तेथील २८ लोकसभेच्या जागांपैकी किमान १५ जागा जिंकतील असे वाटत असताना या राज्यात भाजपाने १८ जागांवर आघाडी घेतली असून १० जागी काँग्रेसला आघाडी आहे. तर एच डी देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलर पक्षाला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. तसेच हसन मतदारसंघातील वादग्रस्त उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांच्यापेक्षा काँग्रेसचे उमेदवार श्रेयस पाटील यांना ४३ हजार ७५६ मतांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश भाजपाची सत्ता असून येथील २९ जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

पंजाबमध्ये काँग्रेसने ७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर आम आदमी पार्टीला ३ जागांवर आघाडी मिळाली आहे. विशेष म्हणजे पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये थेट लढत झाली होती. तसेच शिरोमणी अकालीला १ जागेवर आघाडी मिळाली असल्याचे दिसून येत आहे. तेलंगणामध्ये भाजपा आणि काँग्रेस ८ जागी जागी आघाडीवर असून एमआयएमला १ जागेवर आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बँनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने आपला करिष्मा कायम राखला असून या ४२ मतदारसंघात तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. तर ११ लोकसभा मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेस १ जागेवर आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. तर तामीळनाडूमध्ये डिमके पक्षाला २१ जागी आघाडीवर आहे. तर काँग्रेस ९ जागांवर आघाडी असून सीपीआय २ आणि सीपीआयएमएल २ जागांवर आघाडीवर आहे. या राज्यात भाजपाला शिरकाव करता आला नाही.

पॉंडिचरी राज्यात १ जागा असून तेथेही काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. तर ओडिसा येथे १९ जागांवर भाजपा, बीजेडी १ आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीत मात्र भाजपाने सातही जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि आम आदमी पार्टीला एकही जागा मिळताना दिसून येत आहे.

एकूण देशातील लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीची आकडेवारी पाहिली तर भाजपा प्रणित रालोआ २४१ ठिकाणी आघाडीवर असून यापैकी फक्त ३ जागांवर विजय मिळविला आहे. तर काँग्रेस ९८ जागांवर आघाडी असून १ जागेवर विजय मिळविला आहे. इंडिया आघाडीतील समाजवादी पार्टी ३५ ठिकाणी, तृणमूल काँग्रेस ३० जागांवर, डिमके-२१ जागांवर, शिवसेना ११ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस ६ जागांवर राष्ट्रीय नजता पार्टी ४ जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *