Breaking News

मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, अन्यथा निवडणूकीत नावे घेऊन… सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करा

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मराठा समाजातील सगेसोयरे यांनाही आरक्षणाचा लाभ द्यावा या प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचे आंदोलनकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांनी फेब्रुवारी अखेरपर्यंत वाट पाहिली. मात्र मार्च महिन्यात आचारसंहिता जारी झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी काही काळ मराठा आरक्षणाचे आंदोलन काही काळ स्थगित ठेवले. आता केंद्रात नवे सरकार स्थापनापन्न होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी करा या मागणीसाठी मराठा आरक्षणाचे आंदोलन अंतरावली सराटे येथे आज पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला.

त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या आंदोलनाच्या विरोधात काही जणांनी निवेदन देत आंदोलनास परवानगी देवू नये अशी मागणी केली. त्यावर आत इतक्या दिवस आंदोलन सुरु होते तर त्याचा त्रास झाला नाही मग आताच कसा त्रास होणार आहे असा सवाल करत उद्या जर आम्ही तुमच्या यात्रेविरूध्द अर्ज दिला तर तुम्ही परावनगी नकारणार का असा उपरोधिक सवाल करत मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाच्या विरोधात हे निवेदन देणारे कोण आहेत हे सर्व जगजाहिर असल्याचा दावाही यावेळी केला.

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला राजकारणात पडायचं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करणारे आदेश काढावेत आमची एवढीच मागणी आहे. तसेच राज्याच्या मराठा समाजाच्या तरूणांवर दाखल केलेले गुन्हे अद्याप मागे घेतले नाहीत. ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी करत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा आम्ही आमचे आंदोलन मागे घेतो अशी मागणीही केली.

तसेच पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या गोर-गरिबांना जर आरक्षण दिलात तर हाच समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. मात्र जर दिलेले आश्वासन तुम्ही पाळणार नसाल तर आगामी लोकसभा निवडणूकीत आम्ही एकेकाचे नाव घेऊन काय करतो ते बघा असा गर्भित इशारा देत पण राजकारणात आम्हाला पडायचं नाही. आम्हाला मराठा समाजातील बांधवासाठी आरक्षण हवं आहे असा पुर्नरूच्चारही यावेळी केला.

Check Also

नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य,… लढाई अजून संपलेली नाही काँग्रेसच्या ५ न्याय व २५ गॅरंटी घरोघरी पोहचवण्यात सेल व विभागाचे मोठे योगदान

काँग्रेस पक्ष हा सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. आगामी निवडणुकीत सर्व समाज घटकाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *