Marathi e-Batmya

विनापरवानगी लाडक्या बहिणीचा फोटो टाकणारे आमदार अनिल शिरोळे अडचणीत

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातींवरून राज्य सरकार अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत. पुण्यातील एका आमदाराने विनापरवानगी दलित समाजातील दोन महिल्यांचा फोटो या योजनेच्या जाहितीवर टाकल्याने संबंधित महिलांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली असून आता या महिलांच्या समर्थनार्थ बदनामी केल्याप्रकरणी भीम आर्मी आक्रमक झाली असून संबंधित आमदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात सत्तादारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात येत आहेत. हि योजना पूर्ण होणारच असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे, राज्यातील महिला या योजनेवर खुश असून मोठ्या प्रमाणावर अर्ज सादर केले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र पुणे जिल्ह्यातल्या शिवाजी नगर येथील भाजपा आमदार अनिल शिरोळे यांनी या योजनेच्या जाहिरातीत पुण्यातील दलित समाजातील दोन महिन्यांचे फोटो त्यांच्या विना परवानगीने फोटो वापरल्यामुळे या महिलांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यासाठी धाव घेतली होती, या वेळी भीम आर्मीचे माजी प्रदेश अध्यक्ष सीताराम गंगावणे यांनी या महिलांना सहकार्य केले.

आमदार शिरोळे यांनी गंगावणे यांची या प्रकरणात नाहक बदनामी केल्याचा आरोप भीम आर्मीने केला असून गंगावणे यांच्याविरोधात कोणताही ४२० चा गुन्हा दाखल नसताना अंगलट आलेले प्रकरण दडपण्यासाठी आमदार शिरोळे वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवीत असल्याचा पलटवार आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. तसेच आमदार अनिल शिरोळे यांच्या विरोधात ठिकठिकाणी पोलिसांमध्ये तक्रारी करण्यात येणार असल्याचे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला.

Exit mobile version