Breaking News

‘राज’ इशारा, कोश्यारींची होशियारी ? राज्यपालांच्या त्या वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी दिला इशारा

मुंबईच्या आर्थिक राजधानीच्या दर्जावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी बाहेर काढले तर इथे पैसाच राहणार नसल्याचे सांगत नंतर मुंबईला आर्थिक राजधानी कोणी म्हणणार नाही असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना इशारा देत कोश्यारींची होशियारी? असे म्हणत निवडणूकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून गढूळ करू नका असा इशारा देत दिला.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या त्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज ठाकरे यांनी एक पोस्ट समाजमाध्यमावर शेअर करत राज्यपालांना इशारा दिला.

राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये म्हणतात, आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहित नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं सन्मानातं पद आहे म्हणून आपल्या विरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात.

महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमिन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना?, दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? असा सवालही त्यांनी यावेळी राज्यपालांना केला.

उगीच निवडणूकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका इसा इशारा देत ते पुढे म्हणाले, तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुध खुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *