Marathi e-Batmya

बांग्लादेशाचे नवे पंतप्रधान म्हणून मुहम्मद युनूस शपथ घेणार

नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस गुरुवारी (८ ऑगस्ट, २०२४) बांग्लादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेणार आहेत. मुहम्मद युनूस यांचे नावे पंतप्रधान पदासाठी अंतिम करण्यात आल्यानंतर मुहम्मद युनुस म्हणाले की मिळालेल्या नव्या विजयाचे चांगल्या संधीत रूपांतर करण्यासाठी प्रत्येकाला शांत राहण्याचे आणि “सर्व प्रकारच्या हिंसाचारापासून दूर राहण्याचे” आवाहन केले.

कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले असताना, लष्कर प्रमुख जनरल वाकर-उझ-झमान यांनी बुधवारी घोषणा केली की, अंतरिम सरकार गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास शपथ घेईल. या सरकारच्या सल्लागार समितीमध्ये १५ सदस्य असण्याची शक्यताही यावेळी व्यक्त केली.

जनरल झमान पुढे म्हणाले की, शेख हसिना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि विद्यार्थ्यांच्या आरक्षणातील भेदभावाविरुद्धच्या आंदोलनाच्या हिंसक सरकारविरोधी निदर्शनांनंतर देशातून पळून गेल्या, सशस्त्र दलाने ८४ वर्षीय युनूस यांना शक्य ते सर्व सहकार्य करेल असेही यावेळी सांगितले.

बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया, ज्यांना मंगळवारी नजरकैदेतून मुक्त करण्यात आले, त्यांनी मुहम्मद युनूस यांच्या निवडीचे स्वागत करत मुहम्मद युनूस यांची निवड म्हणजे हा “राग” किंवा “सूड” नसून “प्रेम आणि शांती” आहे, यातूनच राष्ट्राची पुनर्बांधणी करता येणार असल्याचे सांगितले.

बांग्लादेशचे विद्यार्थी आंदोलनाचे नेते नाहिद इस्लाम आणि आसिफ महमूद हे मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमध्ये सामील होणार आहेत, असे बांग्लादेशी दैनिक प्रथम आलोच्या हवाल्याने रॉयटर्सने वृत्त दिले.

Exit mobile version