Breaking News

एटापल्ली नक्षल्यांचा पत्रक वाटून राज्य सरकारला इशारा एटापल्ली तालुक्यातील नक्षलवादी आक्रमक

अधुरा सपना पुरा करेंगे, असा इशारा नक्षल्यांनी गडचिरोली जिल्ह्यात पत्रकं वाटले आहेत. नक्षली चळवळीवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे नक्षलवादी आता आक्रमक झाले आहेत. अलीकडे झालेल्या एटापल्ली तालुक्यातील चकमकीत 12 माओवादी ठार झाले होते. नक्षल्यांनी वाटलेल्या पत्रकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात आले आहे. अजित पवार

23 दिवसांपूर्वी एटापल्ली तालुक्यातील जारावंडी हद्दीत नक्षलवादी आणि C-60 जवानांमध्ये चकमक उडाली होती. त्यात 12 नक्षलवादी ठार झाले होते. तीन आठवड्यांनी शनिवारी माओवाद्यांनी पत्रक जारी केले आहे. जन सुरक्षा विधेयक आणि बारा नक्षलवाद्यांच्या चकमकी वरून माओवादी आक्रमक झाले असून त्यांनी पत्रकातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे.

गडचिरोली येथील खनिज संपत्ती वर सरकारचं डोळा असल्याचं सांगत गडचिरोली जिल्ह्यात असलेलं मौल्यवान खनिज उद्योगपतींना मातीमोल दराने देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा माओवाद्यांचा पत्रकातून आरोप आहे. या पत्रकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावरही माओवाद्यांनी टीका केली आहे अलीकडे येत असलेल्या जन सुरक्षा विधेयकावरही माओवाद्यांनी टीका केली आहे.

नक्षल्यांचा पश्चिम बस सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने शनिवारी पत्रक जारी केले आहे. त्यात त्याने या चकमकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यात नक्षलवाद्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सन्मानपूर्वक त्यांच्या नातेवाईकांना देण्याची मागणी केली आहे. अधुरा सपना पुरा करेंगे, आशा आशयाच्या या पत्रातून नक्षलवाद्यांनी पुन्हा आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

Check Also

रोहित पवार यांचे छगन भुजबळ यांना आव्हान, आरोप सिद्ध करून दाखवा… प्रचंड दहशतीत असलेल्यांना धीर देणे चूकीचे काय

मागील सहा महिन्याहून अधिक काळ मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह मनोज जरांगे पाटील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *