Breaking News

नाना पटोले यांचा आरोप, पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट पीकविम्यासाठी नोंद करावयाची महसूल विभागाची वेबसाईटच बंद

राज्यात मराठवाड्यासह विविध भागात दुष्काळ आहे, शेतकरी संकटात आहे असे असताना शेतकऱ्याला मदत मिळत नाही तर दुसरीकडे पिकविमा कंपन्या शेतकऱ्यांच्या जीवावर खिसे भरत आहेत. राज्यातील सरकार पीक विमा कंपन्यांबरोबर आहे, मोदींच्या मित्रोंबरोबर आहे. महसूल विभागाची वेबसाईट आजही बंद आहे, या बेवसाईटवर नोंद झाली नाही तर पीक विमा मिळत नाही. शेतकऱ्यांची लूट करणारे हे पीकविमा धोरण बदलून शेतकरी हिताचे धोरण बनवा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाप्रणित शिंदे सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, शेतकरी दुष्काळाचा सामना करत असतानाही शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळत नाही. सरकार ऐकायला तयार नाही. महाराष्ट्रात रोज ४ शेतकरी आत्महत्या होत आहेत, अधिवेशन काळातही या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. शेतकरी जगला तर देश जगेल म्हणूनच संकटातील शेतकऱ्याला आधार देण्यासाठी सरसकट कर्ज माफी जाहीर करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. पण या सरकारला शेतकऱ्यांचे हित साधायचे नाही, भाजपाप्रणित शिंदे सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, मागासवर्गीय मुलांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे, ओबीसी मुलांना ५ वर्षांपासून शिष्यवृत्ती दिली जात नाही. ओबीसी समाजाच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे व शेतीपासून बरबाद करायचे हे काम भाजपा सरकार करत आहे. सरकारच्या अशा चुकीच्या धोरणाविरोधात आमचा लढा सुरु आहे. शेतकरी, ओबीसी, आदिवासी, एससी, एसटी समाजाच्या हितासाठी काँग्रेस पक्षाचा लढा आहे असेही यावेळी सांगितले.

क्रिकेट खेळाडूंसाठी गुजरातची बस कशाला ?

टी-२० वर्ल्डकप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या मिरवणुकीसाठी राज्य सरकारने गुजरातमधून बस आणली यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यातील महायुतीचे सरकार हे गुजरातधार्जिणे आहे, मोदीशाहला ते त्यांचा आका म्हणतात. बेस्टकडे चांगल्या दर्जाची ओपन बस असताना वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंच्या मिरवणुकीसाठी गुजरातमधून बस आणणे हा खेळाडूंचा अपमान आहे. दिल्लीच्या आदेशावरून गुजरातची बस मुंबईत आणली असावी. खेळाडूंचे कौतुक केले पाहिजे पण त्यासाठी गुजरात समोर झुकण्याची गरज नव्हती, असेही नाना पटोले म्हणाले.

Check Also

नाना पटोले याची मागणी, फेरीवाल्यांवर सुरु असलेली कारवाई तात्काळ थांबवा राज्य सरकारच्या उदासिनतेमुळे गरीब फेरीवाल्यांना आजही ठरतात कारवाईचे बळी

मुंबईसह राज्यातील इतर शहरात अंदाजे ३० लाख फेरीवाले आहेत, पण त्यांच्यासाठी ठोस धोरण नसल्याने आजही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *