Breaking News

महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते करण्यात आला प्रदान

शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी तसेच माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील चार शिक्षकांना द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने आज सन्मानित करण्यात आले.

शैक्षणिक मोबाईल ॲप, उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामुग्री निर्मिती, दृश्य व श्राव्य सामुग्री निर्मिती, संगणक, दूरचित्रवणी, यु-ट्यूब, आकाशवाणी, सॉफ्टवेअर, हार्डवेयर आदिंचा उपयोग करून शालेय शिक्षण सुलभ, गुणात्मक आणि संशोधनात्मक बनविणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी, सुकन्या मुजुमदार यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी, महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि कौशल्य कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२४ चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. शालेय विभागात गडचिरोली जिल्ह्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके तर कोल्हापूरच्या एस. एम. लोहिया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील चित्रकला शिक्षक सागर बागडे, तर उच्च शिक्षण विभागात पुण्यातील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक डॉ. शिल्पागिरी प्रसाद गणपुले, आयआयएसइआर पुणे संस्थेतील प्रा. श्रीनिवास होथा तसेच भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्रालयातंर्गत आयटीआय निदेशक विवेक चांदलिया या शिक्षकांचा समावेश आहे.

या वर्षापासून, राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची व्याप्ती वाढवून उच्च शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या शिक्षकांचाही यात समावेश करण्यात आला आहे. यावर्षी ५० शालेय शिक्षक, उच्च शिक्षण विभागातील १६ शिक्षक आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या १६ शिक्षकांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. गुणवत्तेचे प्रमाणपत्र, ५०,००० रुपये आणि एक पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *