Breaking News

निलेश लंकेंनी घेतली इंग्रजीतून शपथ तर राहुल गांधीचे प्रणिती शिंदे शी शेकहॅन्ड लोकसभा अधिवेशनाचा दुसरा दिवस

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके आणि भाजपाचे उमेदवार डॉ सुजय विखे-पाटील यांच्यात लढत झाली. या मतदारसंघातील निवडणूकीच्या दरम्यान निलेश लंके यांच्या शैक्षणिक गुणवतेवरून आणि इंग्रजी भाषा येत नसल्याचा मुद्दा प्रचारात उपस्थित झाला होता. तसेच या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि भाजपामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. निलेश लंके यांनी बाजी मारत भाजपा उमेदवाराचा पराभव करत विजय मिळविला. आज १८ लोकसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नव्या लोकप्रतिनीधींचा शपथविधी पार पडला. यावेळी निलेश लंके यांनी चक्क खासदारकीची शपथ इंग्रजी भाषेतून घेत सर्वांनाच चाट पाडले. त्यामुळे निवडणूक काळात कमी शिक्षणावरून केलेल्या टीकेला चांगलेच प्रतित्युर दिले.

तर दुसऱ्याबाजूला मागील १० वर्षापासून भाजपाच्या ताब्यात असलेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून घेण्यात यशस्वी ठरलेल्या आणि पहिल्यादांच लोकसभेत खासदार म्हणून गेलेल्या प्रणिती शिंदे यांनी आज खासदारकीची शपथ घेतली. प्रणिती शिंदे यांचे नाव लोकसभा सचिवांनी पुकारल्यानंतर मागील बाजूने प्रणिती शिंदे या उठून अध्यक्षांच्या दिशेन चालू लागल्या. त्यावेळी पहिल्या बाकावर बसलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नमस्कार केला. मात्र राहुल गांधी यांनी प्रणिती शिंदे यांच्याशी हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या.

या दोन्ही घटनांमुळे अहमदनगर आणि सोलापूर येथील मतदारांना सुखद धक्का बसला असून निलेश लंके आणि प्रणिती शिंदे यांच्या बद्दल कुतुहल मिश्रीत आदर व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या की, आणीबाणी लोकशाहीतील काळा अध्याय लोकशाहीवरील मोठा हल्ला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *