Breaking News

नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट, पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देण्याचे आश्वासन… विरोधी पक्षाच्या नेत्याने दिले होते पाठिंबा देण्याचे आश्वासन

एका राजकीय नेत्याने एकदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरल्यास त्यांना पाठिंबा देण्याची ऑफर दिली होती, परंतु ही ऑफर नाकारली असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केला.

ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजच्यावतीने आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. त्यावेळी नितीन गडकरी यांनी वरील गौप्यस्फोट केला.

पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, मला एक घटना आठवते… मी कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव घेणार नाही. परंतु ती व्यक्ती एकदा माझ्याशी बोलताना म्हणाली की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ,’ असे आश्वासन दिल्याचा गौप्यस्फोट केला.
नितीन गडकरी यावेळी म्हणाले की, पंतप्रधान बनणे हे आपल्या आयुष्यातील ध्येय नव्हते, असे स्पष्ट करत लोकांसाठी काम करणे ही जास्त महत्वाचे असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, परंतु मी विचारले की तुम्ही मला पाठिंबा का द्यावा आणि मी तुमचा पाठिंबा का स्वीकारू? पंतप्रधान होणे हे माझ्या आयुष्याचे ध्येय नाही. मी माझ्या विश्वासाशी आणि माझ्या संघटनेशी एकनिष्ठ आहे आणि मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही. कारण माझी समजूत माझ्यासाठी सर्वात महत्वाची आहे, असेही यावेळी सांगितले.

२०२४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून नितीन गडकरींचे नाव चर्चेत आले. या वर्षी फेब्रुवारीमध्ये सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यानंतर नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदासाठी सर्वात योग्य नेते म्हणून गडकरी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

नागपूर लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा विजयी झालेले गडकरी हे भाजपामधील प्रमुख व्यक्ती आहेत आणि त्यांना आरएसएसचा भक्कम पाठिंबा आहे. ते सध्या सर्वात जास्त काळ रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत, त्यांनी दहा वर्षांहून अधिक काळ या पदावर काम केले आहे.

Check Also

महाराष्ट्रातील वीज खरेदीचे कंत्राट अदानीला; जयराम रमेश यांचे पाच प्रश्न जयराम रमेश यांचा आरोप, पराभवाच्या छायेखाली असतानाही कंत्राट अदानीलाच

राज्याच्या ऊर्जा विभागाने नुकतेच वीच खरेदी संदर्भात निविदा काढली होती. मात्र हि निविदा अदानीलाच मिळावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *