Breaking News

राजकारण

आयुक्तांच्या बदलीसाठी देव पाण्यात ! सत्ताधारी भाजपाचे अपयश लपविण्यासाठी धडपड...

पनवेल : प्रतिनिधी सत्ताधारी गटाचे औषधापुरतेही अस्तित्व जाणवू न देता प्रशासकीय निर्णय घेवून पनवेल महापालिकेच्या कारभाराला विकासाचे पंख जोडणारे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे राजकीयदृष्ट्या डोईजड झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीसाठी भाजपा नेतृत्वाने अक्षरशः देव पाण्यात बुडवले आहेत. राज्य मंत्रिमंडळातील सदस्य असलेले जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांचे पनवेलचे आयुक्त डॉ. …

Read More »

सत्य दडवण्यासाठी ‘भीमा-कोरेगाव’च्या चौकशी समितीत मुख्य सचिव विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सरकारवर टिकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी भीमा-कोरेगाव दंगलीबाबतचे सत्य सरकारला दडवायचे असून, त्यासाठीच राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीत राज्याच्या मुख्य सचिवांचा समावेश झाल्याचे टीकास्त्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोडले आहे. या हिंसाचाराच्या चौकशीसाठी व्दिसदस्यीय चौकशी समिती नेमण्याबाबत सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, मुळात या गंभीर प्रकरणाची …

Read More »

अखेर दोन दलित सनदी अधिकाऱ्यांनी केला राजकारणात प्रवेश सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे, किशोर गजभियेंचा यांचे काँग्रेसमध्ये स्वागत

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील काँग्रेसच्या राजवटीला कंटाळून आणि कार्पोरेट क्षेत्रातील भल्यामोठ्या पगारींच्या आकड्यांना भुलत सनदी अधिकारी पदाचा राजीनामा देत कार्पोरेट क्षेत्रात उडी मारणाऱ्या सनदी अधिकारी किशोर गजभिये आणि निवृत्त अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नवी दिल्ली येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा …

Read More »

मतदान करणे बंधनकारक करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वक्तव्य

मुंबई: प्रतिनिधी सरकारी पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी देशातील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका एकत्रित घेण्याचा सुतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर त्याचधर्तीवर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्रित घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने अहवाल सादर करावा अशी सूचना करत राज्य सरकारच्या कारभाराबाबत अनेकजण बोलतात. मात्र मतदानाला जात नाहीत. त्यामुळे मतदान करणेही कायदेशीर …

Read More »

मंत्रालय सुसायड पाँईट बनलाय का? विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष पसरला आहे. महिनाभरातील ही तिसरी घटना असून ही घटना नेमकी का घडली याचा खुलासा राज्य सरकारने करावा अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. हर्षल रावते या ४५ वर्षीय तरूणाने मंत्रालयातील पाजव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना कळताच मंत्रालयात पाहणी …

Read More »

राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला सादर होणार तर अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवात २६ फेब्रुवारीपासून

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या प्रगतीची दिशा दाखविणाऱ्या अर्थसंकल्प मार्च महिन्याच्या ९ तारखेला विधिमंडळात सादर करण्यात येणार आहे. तर अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवात २६ फेब्रुवारी पासून सुरु होणार असल्याची माहिती सांसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी दिली. विधिमंडळाच्या सांसदीय सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवात २६ …

Read More »

सातवा वेतन आयोगाच्या नावाखाली सरकारी कर्मचाऱ्यांचाही शेतकरी करणार का? सरकारी कर्मचारी-अधिकारी आणि संघटनांचा सरकारच्या निर्णयाविरोधात त्रागा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारने ऑनलाईनचा ज्या पध्दतीने घोळ घालत कर्जमाफीपासूब वंचित ठेवले. त्याच पध्दतीने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसाठी सरकारकडून वेतन सुधारणेच्या संदर्भातील मागण्या ऑनलाईन पध्दतीने नोंदविण्याचा निर्णय सरकारने घेत सरकारी कर्मचाऱ्यांचाही शेतकरी करायचाय का? असा सवाल राज्य सरकारी  कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या …

Read More »

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर सातवा वेतन आयोग देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी केंद्राच्या संरचनेनुसार व केंद्राने लागू केलेल्या दिनांकापासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ३२ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य सचिव सुमित मल्लिक, संघटनेचे संस्थापक  र. ग. कर्णिक, अध्यक्ष …

Read More »

विरोधकांकडून होत असलेले आरोप तथ्यहीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचा खुलासा

मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते यांनी माझ्यावर केलेले आरोप हे पुर्णत: निराधार आहेत. माझ्या मतदारसंघातील माझे विरोधक हेमंत देशमुख यांच्या माहिती व सांगण्यावरुन माझ्यावर तथ्यहीन आरोप करण्यात येत असल्याचा खुलासा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी एका लेखी निवेदनाच्या माध्यमातून केला. तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्रा. लि. या कंपनीशी माझा …

Read More »

पर्यटन विभागाच्या रिसार्टवरच मंत्री रावल यांचा अवैध कब्जा तोरणमाळ हिल रिसॉर्टप्रकरणी मंत्री रावलांची हकालपट्टी करण्याची मलिक यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यात आरोप प्रत्यारोपच्या फैरी झडत असतानाच नोटाबंदीच्या काळात मोदी सरकारने काळ्या यादीत टाकलेल्या दोन कंपनीच्या माध्यमातून पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पर्यटन विभागाच्या मालकीचे असलेल्या तोरणमाळ हिल रिसॉर्टवरच कब्जा केल्याचा दुसरा आरोप राष्ट्रवादी …

Read More »