Breaking News

राजकारण

पर्यटन विभागाच्या रिसार्टवरच मंत्री रावल यांचा अवैध कब्जा तोरणमाळ हिल रिसॉर्टप्रकरणी मंत्री रावलांची हकालपट्टी करण्याची मलिक यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यात आरोप प्रत्यारोपच्या फैरी झडत असतानाच नोटाबंदीच्या काळात मोदी सरकारने काळ्या यादीत टाकलेल्या दोन कंपनीच्या माध्यमातून पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पर्यटन विभागाच्या मालकीचे असलेल्या तोरणमाळ हिल रिसॉर्टवरच कब्जा केल्याचा दुसरा आरोप राष्ट्रवादी …

Read More »

त्या तरूणाच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पेपर तपासणीचे कृषीमंत्र्याचे आदेश वडीलकीच्या नात्याने समजावीत न्याय देण्याची कृषीमंत्र्यांनी दिली ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अविनाश शेटे याच्या कृत्याची तात्काळ दखल घेत कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी शेटेने दिलेल्या सहाय्यक कृषी अधिकारी पदासाठीच्या २०१३ च्या परीक्षेतील उत्तर पत्रिकेची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले. तसेच त्याचे सांत्वन करून न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले. कृषीमंत्र्यांना या …

Read More »

‘फसणवीस सरकार’ राज्यातील जनतेशी ‘ब्ल्यू व्हेल’ गेम खेळतेय काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण, मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याचे प्रकार व त्यात आता सुशिक्षित बेरोजगारांची पडलेली भर पाहता फसणवीस सरकार राज्यातील जनतेसोबत ‘ब्ल्यू व्हेल गेम’ खेळत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. मंत्रालयात अविनाश शेटे या सुशिक्षित बेरोजगार तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. या दुर्देवी …

Read More »

काँग्रेस-राष्ट्रवादी हे भाऊ-भाऊ पण आघाडीचा निर्णय हायकमांड घेणार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राजकारणात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन वेगवेगळे पक्ष असले तरी आम्ही भाऊ-भाऊ असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी करत राज्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णय दिल्लीतील हायकमांडकडून घेण्यात येणार असल्याचे सांगितले. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूंकामध्ये भाजपला रोखण्यासाठी समविचारी पक्षांची आघाडी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या …

Read More »

पुण्यातील शिवसृष्टीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आराखडा तयार करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी पुणे हे (शिवनेरी, ता. जुन्नर) छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मगाव असून शिवाजी महाराजांचे जास्तीत जास्त वास्तव्यही पुणे जिल्ह्यातच झाले. यामुळे या भागातील नियोजित शिवसृष्टी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची व ऐतिहासिक व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत शिवसृष्टी व मेट्रो हे दोन्ही प्रकल्प एकत्रित सुरू होण्यासाठी त्वरित …

Read More »

शिवसेनाप्रमुख स्व.ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचा आराखडा सादर करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नगरविकास विभागाला आदेश

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारकडून घोषित करण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारकातून सर्वांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने चांगला आराखडा तयार करून सादर करावा असा आदेश नगरविकास विभागाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा आढावा घेण्यासाठी बैठक …

Read More »

मुंबई कॉंग्रेसच्या कार्यालयात सत्यनारायणाची पूजा निमित्त मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्या वाढदिवसाचे

मुंबई: प्रतिनिधी धर्मनिरपेक्षता वादाचा बुरखा पांघरणाऱ्या कॉंग्रेस पक्षालाही निवडणूकांच्या विजयासाठी देवादिकांची आठवण यायला सुरुवात झाली. विशेष म्हणजे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई महापालिकेच्या समोर असलेल्या मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात चक्क सत्यनारायणाची पूजा आज घालण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांचा आज ६ फेब्रुवारी …

Read More »

स्व.गोपीनाथ मुंडेचा राजकिय वारस कोण? पंकजा कि धनंजय, आगामी निवडणूकीत ठरणार

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात लाडकं घराणं असलेल्या मुंडे राजकिय घरणाऱ्याचा अर्थात स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवर नाराजी वाढत आहे. त्यामुळे स्व.गोपीनाथ मुंडे यांचा राजकिय वारसदार कोण? पंकजा कि धनंजय, असा प्रश्न स्थानिक पातळीवर उपस्थित केला जात असून आगामी विधानसभा निवडणूकीत …

Read More »

अंबानीच्या रिलायन्स वीज कंपनीचा कर कोण भरणार? ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारला करापोटी द्यावे लागणाऱ्या १ हजार ४५२ कोटी रूपयांचा भरणा न करताच उद्योगपती अनिल अंबानीने त्याची रिलायन्स वीज कंपनी अदानीला विकली. तरीही राज्य सरकार या कंपनीच्या विक्रीला मान्यता देत असल्याचे दिसून येत असून ही कराची थकीत रक्कम कोण भरणार असा सवाल करत राज्य सरकार अंबानी आणि अदानीवर …

Read More »

आयएएस अधिकारी व्ही.के गौतम यांची दुसऱ्यांदा बदली १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबईः प्रतिनिधी शेतकरी कर्जमाफी वितरणप्रणालीवरून सहकार विभाग टीकेचा धनी ठरल्याने या विभागाचे सचिव व्ही.के.गौतम यांची बदली वित्त विभागात करण्यात आली. त्यास काही महिन्याचा अवधी लोटत नाही. तोच गौतम यांची पुन्हा दुसऱ्यांदा बदली करत त्यांची नियुक्ती पर्यटन व सांस्कृतिक खात्याच्या प्रधान सचिव पदी राज्य सरकारने केली आहे. गौतम यांच्यासह १२ सनदी …

Read More »