Breaking News

राजकारण

अजित पवार म्हणतात दिलेला शब्द फिरविणाऱ्यातला मी नाही भाजप आमदार शेलारांच्या वक्तव्यावर अजितदादांचा खुलासा

मुंबई: प्रतिनिधी मी माझ्या जीवनात एकदा दिलेला शब्द कधीही फिरवित नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाच्याबाबत मी मांडलेली भूमिका कालही तीच होती आजचही तीच आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर हे आरक्षण न्यायालयात टिकणारे हवे. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाने काय अहवाल दिला? याची माहिती सभागृहाला मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत …

Read More »

मराठा आरक्षण द्यायचे असेल तर ५० टक्केपेक्षा जास्तची तरतूद करा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा सरकारला सल्ला

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात न्यायालयात गेल्यास त्या आरक्षणाचे उलट-सुलट होणार आहे. जर आरक्षण द्यायचे असेल तर ते ५० टक्के पेक्षा जास्त देता येणार नाही. तशी सिलिंग राज्यघटनेने नाही तर सर्वोच्च न्यायालयाने घातली आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर संसदेत जावून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या …

Read More »

मराठा, धनगर आरक्षणाच्या अहवालावरून विधानसभा तिसऱ्या दिवशीही तहकूब अहवाल सादर करण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोग आणि टाटा सामाजिक विज्ञान अर्थात टीसचा अहवाल विधानसभेत मांडण्याच्या मागणीवरून विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. तसेच हे दोन्ही अहवाल सभागृहात आजच मांडावा या मागणीवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा …

Read More »

मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी भाजप शिवसेना सरकारच्या दिरंगाईमुळे मराठा आरक्षणासाठी आधीच जवळपास चार वर्ष दिरंगाई झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर कारवाई पूर्ण करून ओबीसी सहित इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता न्यायालयात टिकेल असे  १६ टक्के आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक …

Read More »

अखेर मागास आयोगाच्या अहवालावरून अजित पवार यांची सारवासारव अहवाल सभागृहात मांडण्याने आवश्यकच

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला अहवाल सादर केला. हा अहवाल विधानसभेत ठेवणे आवश्यक असून त्यामाध्यमातून जनतेलाही कळणे आवश्यक आहे. त्यामुळे विधानसभेत यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मांडलेली भूमिका योग्य असल्याची सारवासारव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. विधानसभेत केलेल्या वक्तव्यामुळे …

Read More »

राजदंड पळवूनही सभागृह सुरु ठेवणे म्हणजे सार्वभौम सभागृहाचा अवमान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी सभागृहात राजदंड पळवला जातो याचा अर्थ सभागृहाचे कामकाज बंद व्हायला हवे होते मात्र अध्यक्षांनी सभागृह तहकुब केले नाही. हा एकतर राजदंडाचा अपमान आहे किंवा राज्याच्या सार्वभौम सभागृहाचा अवमान आहे असा आरोप माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज परंपरेनुसार चालते. सभागृहात राजदंड उचलला …

Read More »

आम्हाला चर्चा नको…आधी मदत जाहीर करा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची विधान परिषदेत मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला काम नाही…हातचं पीक गेलं…शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा सवाल करतानाच शेतकरी आपले सरण रचून आत्महत्या करत आहेत… धनगरांनाही आरक्षण मिळत नाही…आम्हाला सभागृहात चर्चा नकोय…आधी मदत जाहीर करावी आणि मराठा आरक्षण पटलावर आणावे अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली मात्र हा …

Read More »

मराठा आरक्षणाच्या अहवाल मांडण्यावरून विरोधकांमध्ये फूट विखे म्हणतात अहवाल मांडा तर अजित पवार म्हणतात मांडू नका

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेचे कामकाज सुरु होताच राज्यातील मराठा समाजाला मागास ठरविणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारने सभागृहात आजच मांडावा अशी भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सभागृहात मांडली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी हा अहवाल सभागृहात मांडण्याऐवजी विरोधकांमधील ज्येष्ठ नेते आणि सत्ताधारी यांच्यात चर्चा करून मराठा …

Read More »

मराठा आरक्षण, दुष्काळी मदतीवरून विधानसभेत विरोधकांच्या हातात राजदंड सभागृहात गोंधळ, कामकाज तीनवेळा तहकूब

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा आरक्षण मिळावे आणि राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल विधानसभेत मांडण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. तर मराठा समाजाला आरक्षण देणारा सशक्त कायदा राज्य सरकारने करावा. त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाचा अहवाल विधानसभेत मांडण्याऐवजी तो थेट पुढे पाठविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी केली. त्यावर …

Read More »

प्यायला नाही पाणी, सरकारची फक्त आश्वासनांची वाणी मराठा आरक्षण, कर्जमाफीच्या प्रश्नावर विरोधकांचे सरकार विरोधात घोषणाबाजी

मुंबई : प्रतिनिधी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील मराठा आरक्षण, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दुष्काळी मदत जाहीर करण्याच्या प्रश्नावरून विरोधकांनी आंदोलन केले. विधिमंडळाचे कामकाज सुरु होण्यापूर्वीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी विरोधकांकडून प्यायला नाही पाणी सरकारची फक्त आश्वासनांची वाणी, विठ्ठला विठ्ठला…मराठा, मुस्लिम, …

Read More »