Breaking News

राजकारण

ठाकरे घराण्यातील वाद अखेर मिटला जयदेव ठाकरेंनी मागे घेतली याचिका

मुंबईः प्रतिनिधी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेच्या वाटणीवरून ठाकरे घराण्यात निर्माण झालेला न्यायालयीन वाद आज अखेर मिटला. मालमत्तेच्या हिश्श्यावरून दोन भावांमध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ सुपुत्र जयदेव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत हिस्सा मागितला. मात्र जयदेव ठाकरे यांनी उच्च न्यायालयातील ही याचिकाच मागे …

Read More »

पुढील शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयात रंगणार निवडणूका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन निवडणूकांमधून खऱ्या अर्थाने नेत्तृत्वाची संधी मिळावी व लोकशाही मार्गाने सार्वत्रिक मतदानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्यास वाव मिळावा यादृष्टीकोनातून पुन्हा एकदा महाविद्यालयीन निवडणूका घेण्यात येणार आहे. या निवडणूकांसाठी नियम तयार केले आहेत. तसेच महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये तरतूद केल्याप्रमाणे पुढील काळामध्ये महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये …

Read More »

दिवाळीसाठी रेशन दुकानावर साखर २० रूपये प्रति किलो दराने मिळणार अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सुमारे १ कोटी २३ लाख रेशन कार्डधारकांना प्रति कुटुंब १ किलो साखर २० रूपये प्रति किलो दराने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यासाठी राज्यात ३९ कोटी रूपये किंमतीची १ लाख २२ हजार ९४७ क्विंटल साखर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट …

Read More »

फडणविसांना रामाचा अवतार जाहीर करा; आपसूकच रामराज्य अवतरेल! राधाकृष्ण विखे पाटील यांची भाजपच्या सुराज्य यात्रेवर सडकून टीका

जालना: प्रतिनिधी मागील ४ वर्ष महाराष्ट्रात ‘कुराज्य’ असताना राज्य सरकारच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘सुराज्य यात्रा’ काढताना भाजपला लाज कशी वाटत नाही? नशीब यात्रेला ‘सुराज्य यात्रा’ असे नाव दिले. ‘राम राज्य यात्रा’ म्हटले नाही. मोदी विष्णूचा अकरावा अवतार असल्याचे भाजपने जाहीर केलेलेच आहे. आता फडणवीस रामाचा अवतार असल्याचे जाहीर करून …

Read More »

ही कसली प्रगती ? ही तर अधोगती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सेना-भाजप युतीला ३१ ऑक्टोंबरला चारवर्षे पूर्ण होत असून या चार वर्षात सरकारने काय केले असा सवाल करीत ही कसली प्रगती ही तर अधोगती असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. राज्य असुरक्षित अर्थशुन्य, अशांत, असहाय्य असल्याचे सांगत राज्य सरकारने काय केले असा सवाल त्यांनी विचारला. …

Read More »

वाढीव महागाई भत्त्याची ९ महिन्याची थकबाकी ऑक्टोबरच्या वेतनात देणार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १ जानेवारी २०१८ पासून १३९ वरून १४२ इतका करण्यात आला होता. तसेच ऑक्टोबर २०१८ च्या वेतनात या महागाई भत्त्याची रक्कम रोखीने देण्याचे आदेश यापूर्वीच निर्गमित करण्यात आले होते. ९ महिन्याच्या थकबाकीचा निर्णय प्रलंबित होता. मात्र आता तो रोखीने देण्याचा …

Read More »

व्हायरस लागलेले सरकार ‘फॉरमॅट’ मारून ‘डिलीट’ करा! विरोधी पक्षनेते विखे पाटील यांचे आवाहन

नांदेड : प्रतिनिधी विजय मल्ल्या, निरव मोदी सारखे अनेक जण सरकारच्या सर्व नियम-कायद्यांना वाकुल्या दाखवत हजारो कोटी रूपये घेऊन पळून गेले. त्यांचे या सरकारला काहीही करता आले नाही. पण शेतकऱ्यांना मदत करण्याची वेळ आली की या सरकारला अटी व निकष आठवतात. या सरकारला अटी अन् निकषांचा ‘व्हायरस’ लागला आहे. त्यामुळे …

Read More »

मोदींनी जाहिर केलेली दुष्काळमुक्त गावे ८ दिवसांत दुष्काळसदृश कशी झाली? राज्यातील ३१ हजार ०१५ गावांतील पाणी पातळीत घट म्हणजे घोटाळा सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी शासनाच्या म्हणण्यानुसार, जलयुक्त शिवार अभियानाला एकूण ७ हजार ७८९ कोटी रुपयांचा खर्च आला. त्यात लोकसहभाग १० टक्के देखील नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार घोटाळा दडविण्याकरिता सरकार गरीब शेतकऱ्यांच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते यांनी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

दुष्काळावरून विरोधकांनी खालच्या पातळीवरील राजकारण थांबवावे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विरोधकांना आवाहन

मुंबईः प्रतिनिधी राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती असताना विरोधक याप्रश्नावर राजकारण करत आहेत. हा संवेदनशील मुद्दा असून दोघांनी मिळून जनतेचे प्रश्न सोडविले पाहिजे. तसेच या मुद्यावरून विरोधक खालच्या स्तराला जात असून यासंबधीचे राजकारण थांबविले पाहिजे असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी करत कदाचीत विरोधक भांबावले असल्याने ते असे खालच्या पातळीवरचे राजकारण …

Read More »