Breaking News

राजकारण

शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी जनतेकडून सरकार वसूल करणार पैसे सौर ऊर्जा कृषी पंपासाठी लागणाऱ्या निधी उपलब्धतेसाठी ऊर्जा विभागाचा विचार

मुंबईः प्रतिनिधी राज्यातल्या आर्थिक परिस्थिती कितीही चांगली असल्याचा दावा राज्य सरकार करत असली तरी तिजोरी रिकामीच असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस येत आहे. शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या सौर कृषी पंपासाठी लागणारा निधी राज्यातील वीज ग्राहकांच्या खिशातून प्रत्येकी वसूल करण्याचा विचार ऊर्जा विभागाकडून करण्यात येत असून कृषी पंपासाठी लागणारा १७०० कोटी रूपयांपैकी …

Read More »

सरकार उलथवून टाकत नाही तोपर्यंत संविधान बचाव आंदोलन थांबणार नाही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा सरकारला इशारा

औरंगाबाद : प्रतिनिधी या सरकारचा संविधानाला विरोध आहे…धर्मनिरपेक्ष शब्दाला विरोध आहे… धर्मनिरपेक्ष शब्द टोचतो का ? ७० वर्ष हा वाद झाला नाही मग आत्ताच का ? जी मनुस्मृती सर्व जातीतील लोकांना नीच मानते,भेदभाव करते अशा मनुस्मृतीला जपण्याचे काम भाजप करत आहे म्हणून संविधान वाचवण्यासाठी राष्ट्रवादीने हे आंदोलन सुरु केले आहे …

Read More »

जनताच माझा पक्ष निवडणूक लढवण्यावर उदयनराजे ठाम

मुंबईः प्रतिनिधी जनताच माझा पक्ष आहे. जोपर्यंत जनतेला मी निवडणूक लढवावी, असे वाटते तोपर्यंत मी निवडणूक लढवणार, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी आपल्याला पक्षाने उमेदवारी देवो अथवा ना देवो, आपण निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार, असल्याचे सूचित केले. मंगळवारी खासदार उदयनराजे मंत्रालयात आले होते. तेथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

मंत्रालयात उदयनराजेंच्या भाजप मंत्र्यांशी गाठी-भेटी मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडे, महाजन यांच्याशी चर्चा

मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी मंत्री परिषदेच्या दिवशी मुंबईत मंत्रालयात येऊन भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्या. उदयनराजे भोसले यांनी पंकजा मुंडे, गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. उदयनराजे लोकसभेची जागा भाजपच्या तिकीटावर लढविणार आहेत. ते भाजपमध्ये दाखल होणार आहेत, अशा देखील …

Read More »

दुष्काळग्रस्त भागाची जबाबदारी आता पालक मंत्र्यांच्या शिरावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील दुष्काळावर चर्चा

मुंबईः प्रतिनिधी मुंबई राज्यावर विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आले आहे. यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर सरकारला यावर उपाययोजना करताना नाकेनऊ येणार आहे. राज्यातील २०१ तालुक्यांत सरासरीच्या ७५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाला असून या भागांतील पिकेही धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर या तालुक्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा मंत्री तसेच …

Read More »

शिवसेनेच्या खासदारांची भाजपबरोबर युतीला मुक संमती लोकसभेला हवी मात्र विधानसभेचा निर्णय तुम्हीच घ्या

मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभेसह कोणत्याही निवडणूकीत भाजपबरोबर युती न करण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली. या घोषणेला ६ महिन्याचा कालावधी लोटूला तरी त्यावर शिवसेनेतूनच एकमत झाल्याचे दिसून येत नसून नुकत्याच झालेल्या खासदारांच्या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी युतीबाबतच्या प्रश्नावर शिवसेनेच्या सर्वच खासदारांनी शांत राहणे पसंत करत एक …

Read More »

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींना मिळणार शिष्यवृत्ती सावित्रीबाई जोतिबा फुले शिष्यवृत्ती योजनेची परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडून घोषणा

मुंबई : प्रतिनिधी एस.टी कर्मचाऱ्यांच्या मुलांना १२ वी नंतर उच्च शिक्षणासाठी सावित्रीबाई जोतिबा फुले शिष्यवृत्ती योजना महामंडळातर्फे सुरु करण्यात आल्याची घोषणा परिवहन व खारभूमी विकास मंत्री तथा एस.टी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. यासंबंधीचे परिपत्रक नुकतेच महामंडळाच्या कर्मचारी विभागामार्फत निर्गमित करण्यात आले आहे. याचा लाभ महामंडळाच्या सुमारे १ लाख …

Read More »

किती शेतक-यांनी आत्महत्या केल्यावर सरकार दुष्काळ जाहीर करणार ? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा सरकारला सवाल

शहादाः प्रतिनिधी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. खरीपाची पिके वाया गेली आहेत. तीव्र पाणीटंचाई आहे. तरीही सरकार दुष्काळ जाहीर करत नाही. आणखी किती शेतक-यांनी आत्महत्या केल्यावर सरकार दुष्काळ जाहीर करणार आहे? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेस …

Read More »

राज्यातील दिव्यांगांसाठी इमारती सुगम्य करायला ५० टक्के निधी केंद्राने द्यावा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची केंद्राकडे मागणी

नवी दिल्ली: प्रतिनिधी महाराष्ट्रातील इमारती दिव्यांगांसाठी सुगम्य करण्यात यावे, यासाठी ५० टक्के निधी केंद्राकडून उपलब्ध व्हावा, अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केली. येथील विज्ञान भवनात शुक्रवारी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग विकासासाठीची दुसरी केंद्रीय सल्लगार बोर्डची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत बडोले यांनी ही मागणी …

Read More »

छत्रपती शिवाजी स्मारकाच्या आराखड्याला अद्याप मान्यताच नाही बांधकाम रखडण्याची शक्यता

मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या नव्या आराखड्याला अद्यापही तांत्रिक समितीची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे ऑक्टोबरपासून सुरू होणारे स्मारकाचे काम आणखी अधिक काळासाठी रखडण्याची शक्यता निर्माण झाली. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या या सस्मारकाचे काम ऑक्टोबरपासून सुरू होणार होते. स्मारकाचा मूळ आराखडा ३ हजार …

Read More »