Breaking News

राजकारण

मंत्रालय लोकशाही दिनात महसूल आणि नगरविकास तक्रारीत अव्वल माहिती अधिकारात उघडकीस

मुंबईः प्रतिनिधी सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी/ अडचणींना तत्परतेने न्याय मिळण्याची शासकीय यंत्रणा म्हणजे ‘लोकशाही दिन’ होय. हा ‘लोकशाही दिन’ जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त आणि मंत्रालय स्तरावर राबविण्यात येत असतो. ११० वा मंत्रालय लोकशाही दिन संपन्न झाला असून १५०५ स्वीकृत अर्जावर सुनावणी घेण्यात आली. सरासरी १३ अर्ज लोकशाही दिनी मुख्यमंत्री यांच्या …

Read More »

तयारीला लागा, पण कामे पूर्ण करा आढावा बैठकानंतर मुख्यमंत्र्यांचे भाजपच्या मंत्र्यांना पत्र

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील भाजप-शिवसेनेच्या सरकारला साडे चार वर्षे पूर्ण होत आली आहेत. त्यातच एकाबाजूला जनतेमध्ये राज्य सरकारच्या विरोधात नाराजी पसरत आहे. तर दुसऱ्याबाजूला केंद्राच्या दुटप्पी धोरणामुळे वाढत्या महागाईला आळा घालणे दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे. यापार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणूकीसोबत राज्यातील विधानसभेच्या निवडणूकीला सामोरे जायचे की स्वतंत्ररित्या जायचे याबाबत भाजपच्या वरिष्ठ …

Read More »

मोदी सरकारवर जनता नाराज नाही तर रागावलीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे टीकास्त्र

सरकारने लाजेखातर म्हणून आज पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले असल्याची जोरदार टिका करत देशातील जनता नाराज नाही तर ती मोदींवर रागावली आहे. कारण त्यांनी देशातील जनतेला फसवलं आहे. त्यामुळे ही जनताच बदला घेईल हे निश्चित असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील केले. ठाणे येथे आय़ोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते …

Read More »

पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त केंद्र व राज्य सरकारचा राज्यातील जनतेला दिलासा

पेट्रोलच्या सततच्या वाढत्या दरामुळे संपूर्ण देशभरात केंद्र सरकारच्या विरोधात रोष वाढत होता. तसेच जनताही त्रस्त झाली होती. त्यामुळे अखेर केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये अडीच रुपयांची कपात करण्याची घोष‍णा केल्यानंतर महाराष्ट्रानेही पेट्रोलच्या दरांमध्ये अडीच रुपयांची कपात करत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामुळे राज्यातील पेट्रोलच्या प्रति …

Read More »

सत्तेतून बाहेर पडा, मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा ! विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेवर बरसले

फैजपूर : प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला असून, अगोदर या दळभद्री सरकारमधून बाहेर पडा; मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा, असे शिवसेनेला सुनावले आहे. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा फैजपूर येथे प्रारंभ करताना ते बोलत होते. …

Read More »

कॉंग्रेसने त्यांच्या १२ पराभूत जागा द्याव्या आम्ही निवडून आणू भारिप नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांची तयारी

मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने आम्ही कुठलीही आघाडी केली नाही. मात्र भाजप-सेनेला पराभूत करण्यासाठी मी काँग्रेसला आघाडी करण्यासाठी एकत्र बसू असे सांगितले होते. मात्र तेच आले नाहीत. त्यामुळे आम्ही एमआयएमने दिलेला हात स्विकारला. तसेच २००४ ते २०१४ पर्यंत काँग्रेस पक्ष ज्या २२ जागांवर पराभूत होत होता. त्यापैकी …

Read More »

३० वर्ष सेवा झालेल्या पोलिसांना राहते घर देण्यासाठी प्रयत्न करणार राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्याकडून जोगेश्‍वरी मजासवाडी पोलिस वसाहतीची पाहणी

मुंबईः प्रतिनिधी ज्या पोलिसांची ३० वर्षांची सेवा झाली आहे, अशा सर्व पोलिसांना रहात असलेले घर त्यांच्या नावावर करावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पार पडलेल्या बैठकीत आग्रही भूमिका मांडली आहे. तसेच ज्याप्रमाणे बी.डी.डी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर पोलिस वसाहतींचेही पुनर्वसन करण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न करीत असल्याचे आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री वायकर यांनी …

Read More »

डॉ. आंबेडकर स्मारकासाठी राज्य गहाण टाकण्याची नव्हे तर इच्छाशक्तीची गरज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

मुंबईः प्रतिनिधी हे राज्य बाबासाहेबांच्या विचारांप्रती कटिबध्द असलेले राज्य आहे.त्यामुळे स्मारक बांधण्यासाठी राज्य गहाण टाकण्याची नव्हे तर इच्छाशक्तीची गरज आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्मारक बांधण्याबाबत राज्य गहाण टाकण्याच्या केलेल्या वक्तव्याचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला आहे. डॉ.बाबासाहेब …

Read More »

भाजप-सेनेच्या सरकारला उखडून फेकण्यासाठी काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा जळगावच्या फेजपूरमधून होणार सुरूवात

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील भारतीय जनता पार्टी-शिवसेना सरकार उखडून टाकण्यासाठी काँग्रेसने काढलेल्या जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा उद्या म्हणजेच गुरूवारपासून जळगाव जिल्ह्यातल्या फेजपूर येथून सुरू होणार आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी खा. मल्लिकार्जुन खर्गे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राज्यातील सर्व …

Read More »

राष्ट्रवादी पक्ष नंबर एकवर आणणार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा निर्धार

पालघरः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळातील लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी समर्थपणे पाय रोवून कसा ठेवला आहे ते पाहण्यासाठी महाराष्ट्रभर फिरुन त्यांच्याशी संवाद साधत आहे. त्यामुळे या बळावर पक्ष एक नंबरवर आणण्यासाठी तुम्ही-आम्ही मिळून काम करुया असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पालघरमध्ये जिल्हा कार्यकारिणी मेळाव्यामध्ये केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार …

Read More »