Breaking News

राजकारण

दोषी अधिकाऱ्यांवर निलंबन आणि दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका मुठा कालवा फुटल्याप्रकरणी अजित पवार यांची मागणी

पुणेः प्रतिनिधी शहरातील दांडेकर पूल परिसरातील मुठा कालव्याचा बांद कोसळून निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे कालव्याचं हजारो लीटर पाणी पर्वती भागातील झोपडपट्टीत घुसलं. पाण्याच्या वेगवान प्रवाहात अनेकांचे संसार वाहून गेले. अकस्मात घडलेल्या या दुर्घटनेमुळे गोरगरिबांचं आर्थिकदृष्ट्या नुकसान झालंच; परंतु मानसिकरीत्या देखील ते खचले आहेत. यापुढे कसं होणार? असा प्रश्न पडलेल्या पूरग्रस्तांची …

Read More »

न्यायालाच्या निकालाने शहरी नक्षलवादावर शिक्कामोर्तब माओवादी नक्षलींना गजाआड जावे लागणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचन्याप्रकरणी कम्युनिस्ट विचारांच्या चार अभ्यासकांवर पुणे पोलिसांनी केलेली कारवाई योग्य ठरत आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची नजर कैदेतील अटक आणखी चार आठवड्यांनी वाढविल्याने शहरी नक्षलवादावर एकप्रकारे शिक्कामोर्तब होत असून त्यांना गजाआड जावेच लागणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देशातील वाढता …

Read More »

विरोधकांच्या खोट्या आरोपांना आक्रमकपणे उत्तर द्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भाजपा कार्यकर्त्यांना सूचना

मुंबईः प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे देश बदलत आहे, हे विकासाचे काम सहन होत नसल्याने विरोधी पक्ष खोटेनाटे आरोप करत आहेत व जातीयवाद वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. आपले सरकार पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त असून भाजपा कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर द्यावे, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी मुंबईत केली. …

Read More »

भाजपा विरोधात मुद्दा नसल्याने विरोधकांचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी गेल्या चार वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीला देशात व महाराष्ट्रात सातत्याने निवडणुकांमध्ये यश मिळाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करूनही सांगली व जळगाव महानगरपालिकांमध्ये भाजपाचाच विजय झाला. विरोधकांना भाजपाच्या विरोधात प्रचाराचा मुद्दा सापडत नसल्यामुळे त्यांनी दिशाभूल करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. …

Read More »

मराठा तरुणांनी नोकऱ्या मागणारे नव्हे, तर देणारे बनावे सरकार प्रश्नांपासून पळ काढणारे नसून प्रतिसाद देणारे असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

ठाणे : प्रतिनिधी मराठा, बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आमचे सरकार प्रामाणिक आणि गांभीर्याने प्रयत्न करीत असून ही स्व. अण्णासाहेब पाटील यांना खरी श्रद्धांजली असणार आहे. मराठा समाजातील तरुणांना शिक्षण, व्यवसाय–रोजगार यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून याचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत मराठा तरूणांनी नोकऱ्या …

Read More »

बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींचा एसटीचा प्रवास होणार मोफत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनीना एस.टी. प्रवास मोफत देण्याचा निर्णय राज्याच्या आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच एस.टी. महामंडळाच्या सवलतींची व्याप्ती वाढवण्याच्या निर्णयांर्तंगत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. यापूर्वी दहावी पर्यंतच्या …

Read More »

शरद पवारांनी खोटं बोलू नये भारिप नेते अँड. प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर पलटवार

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी वगळता काँग्रेस आणि एमआयएमशी आघाडी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावरून भारिपवर टीका केली. त्याचा खरपूस समाचार घेत १९९७-९८ साली झालेल्या निवडणूकीत काँग्रेसचे अध्यक्ष सीताराम केसरी यांच्या बरोबर झालेल्या समझोत्यानुसार निवडणूक लढविली. त्यावेळी झालेल्या समझोत्यात शरद पवार हे …

Read More »

लग्नाला जा पण पेट्रोल, डिझेल आहेर द्या राज्यातील पेट्रोल नव्वदी पारवर काँग्रेसचे अनोखे आंदोलन

ठाणेः प्रतिनिधी पेट्रोलचा दर नव्वदीपार व एक लिटर डिझेलची किंमत 80 रूपयांवर गेल्याने आता पेट्रोलपंपांना संरक्षण देण्याची वेळ आली असून जनतेनेही लग्नात पेट्रोल, डिझेलचा आहेर देणे सुरु करावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे. राज्यात अगोदरच नव्वदी पार गेलेल्या पेट्रोलने आज मुंबई …

Read More »

अधिवेशनात आश्वासन देवूनही बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांना वेळच मिळेना विरोधी पक्षनेते आणि गृहनिर्माण विभागाकडून दोनवेळा स्मरणपत्रे

मुंबईः प्रतिनिधी मुंबईतील समता नगर पुर्नविकास प्रकल्पालाच्या मान्यतेवरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता हे संशयाच्या भोवऱ्यात आले. याविषयीचा मुद्दा अर्थसंकल्पिय अधिवेशनात विरोधकांनी उपस्थित करत राजीनाम्याची मागणी केल्यानंतर सदर प्रकरणी बैठक घेवून निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या आश्वासनास सहा महिन्याचा कालावधी लोटला तरी मुख्यमंत्र्यांना बैठकीसाठी वेळच मिळत …

Read More »

राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष नाही मग पाठिंबा घेतला कशाला? शरद पवार यांचा आंबेडकरांना सवाल

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस धर्मनिरपेक्ष नसता तर अकोल्यात झालेल्या निवडणुकीत दोन वेळा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला नसता, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी केली. भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीबरोबर आघाडी न करण्याची घोषणा करताना राष्ट्रवादी जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप …

Read More »