Breaking News

राजकारण

उत्तर भारतीयांनाही महाराष्ट्रात ओबीसींचा दर्जा द्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

मुंबई : प्रतिनिधी यूपी, बिहार, मध्य प्रदेश येथे या समजाला ओबीसी मानले जाते. मात्र महाराष्ट्रात त्यांची आडनावे ही ओबीसीमध्ये येत नाही म्हणून त्यांचा समावेश ओबीसी मध्ये होत नाही. त्यामुळे  यूपी, बिहारमधील मुंबईत राहणाऱ्या या समजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मागणी केल्याचे मुंबई …

Read More »

मराठवाड्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाणार मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरा

औरंगाबाद :प्रतिनिधी मागील चार वर्षात सिंचनाचा अनुशेष, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, बळीराजा शेतकरी संजिवनी योजना, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, ऑरिक सिटी, मराठवाडा वॉटर ग्रीड अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून शासनाने मराठवाड्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याची वाटचाल सुरू केलेली आहे. मराठवाड्याला दुष्काळ मुक्तीकडे नेण्यासाठी जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, वृक्ष लागवड मोहीम येथे प्रभावीपणे राबविली. यापुढेही मराठवाड्याला विकास, समृद्धीच्या दिशेने पुढे घेऊन …

Read More »

गणेशोत्सवाच्या निमित्ताने नाराजांची भाजप नेत्यांच्या घरी गाठी-भेटी कृपाशंकर सिंह, राष्ट्रवादीचे जयदत्त क्षिरसागर भाजपच्या रांगेत

मुंबई : प्रतिनिधी राज्यात गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. परंतु राजकिय क्षेत्रात यानिमित्ताने एका पक्षातील नाराजांनी सत्ताधारी पक्षातील वजनदार नेत्यांच्या घरी गाठ-भेटी घेण्याच्या मार्गाला लागले. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने   यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्यानंतर काँग्रेसचे नाराज नेते आणि अडगळीत पडलेले कृपाशंकर सिंह यांनी गतवर्षीप्रमाणे यावर्षीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

पुरोगामी भारतात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ हरयाणातील बलात्काराच्या घटनेचा निषेध करत खा. सुप्रिया सुळे यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी पुरोगामी विचाराच्या भारतात महिलांवर होणारे बलात्कार वाढतच चालले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने मुलींच्या शिक्षणाबाबत, सुरक्षिततेबाबत बोलत असतात मग त्यांच्याच सरकारमध्ये अशा घटना का घडत आहेत. त्याबाबत मोदी मौन बाळगून का आहेत असा सवाल करतानाच आज हरियाणामध्ये मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेचा जाहीर निषेध खासदार सुप्रिया सुळे …

Read More »

आमदार आव्हाड, दाभोळकर, मानव यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा दया राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई  : प्रतिनिधी ‘सनातन’च्या हिटलिस्टवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह आणखी दोघांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा दयावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मिडियाशी बोलताना दिली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, …

Read More »

भ्रष्ट पीएंना मारहाण, उद्या हीच वेळ मंत्र्यांवरही ओढवेल! विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सरकारवर टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या स्वीय सहाय्यकाने १० लाख रूपये घेऊन काम न केल्यामुळे त्याची मंत्र्यांच्याच दालनात झालेल्या यथेच्छ ‘धुलाई’वरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाना साधला आहे. आज भ्रष्ट पीएंना मारहाण होते, अशीच परिस्थिती राहिल्यास हीच वेळ उद्या मंत्र्यांवरही ओढवू …

Read More »

शाळांमध्ये मोदींचा लघुपट दाखवणे म्हणजे मोदींची लोकप्रियता ढळली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी शाळांमध्ये मोदींचा लघुपट दाखवणे म्हणजे मोदींची देशातील लोकप्रियता ढळू लागली असल्याचे संकेत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. मोदींचा लघुपट शाळांमध्ये दाखवण्याचा आदेश शाळांना सरकारने काढला आहे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे अशी माहिती नवाब मलिक यांनी मिडियाशी बोलताना …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा मराठा आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची उध्दव ठाकरेंची मागणी

मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी राज्यभर केलेल्या आंदोलनात शेकडो निरपराध आंदोलनकर्त्यांवर राज्य सरकारने गुन्हे दाखल केले. या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचे जाहीर आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची आठवण शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी करून देत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मराठा समन्वयकांनी …

Read More »

१३२ दिवसांपासून मुख्यमंत्र्यांना अहवाल पाह्यला वेळच नाही महापालिकेच्या पारदर्शक कामकाजासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल सादर

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील महापालिकांमधील पारदर्शक कामकाजासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या ३ सदस्यीय समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला. मात्र हा अहवाल सादर करून १३२ दिवस झाले तरी मुख्यमंत्र्यांनी पाह्यला नसल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारात उघडकीस आली आहे. हा अहवाल नगरविकास विभागाला दिली आहे. गेल्या १३२ दिवसांपासून अहवालातील शिफारशीवर …

Read More »

फुंडकरांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ३ ऑक्टोबरला मतदान भाजपामध्ये तिकिटासाठी चढाओढ

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी येत्या तीन ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत याची घोषणा केली. विधानसभा सदस्यांकडून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सदस्यांच्या माध्यमातून फुंडकर विधान परिषदेवर निवडून गेले होते. २४ एप्रिल २०२० पर्यंत त्यांचे सदस्यत्व होते. परंतु …

Read More »