Breaking News

राजकारण

छिंदम, परिचारक आणि राम कदम सगळी हीनवृत्तीची माणसे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी महिलांविषयी अपशब्द काढणाऱ्या भाजपचे आमदार राम कदम यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी करत भाजपचा उपमहापौर छिंदम, आमदार प्रशांत परिचारक आणि राम कदम ही सगळी हीनवृत्तीची माणसे असल्याची टीकाही त्यांनी केली. वांद्रे येथील रंग शारदा सभागृहात आयोजित शिवसेनेच्या बैठकीनंतर …

Read More »

तेल कंपन्यांची तिजोरी भरण्यासाठीच पेट्रोल-डिझेलची दरवाढ विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सरकारवर टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी आगामी चार विधानसभा निवडणुकींपूर्वी पेट्रोल-डिझेलची सातत्याने दरवाढ करून सरकार तेल कंपन्यांची तिजोरी भरते आहे. ऐन निवडणुकीच्या काळात हेच दर पुन्हा थोडेफार कमी करून आम्ही लोकहिताची किती काळजी घेतो, असा आव केंद्र सरकारकडून आणला जाईल,असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीसंदर्भात विखे पाटील यांनी …

Read More »

केरळ पुरग्रस्तांसाठी नांदेडच्या गुरुद्वारा बोर्डतर्फे २० लाखांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे २७ लाख रूपयांचा धनादेश सुपुर्द

मुंबई : प्रतिनिधी केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुरुद्वारा बोर्ड तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब, नांदेडतर्फे २० लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सुपुर्द करण्यात आला. यावेळी गुरुद्वारा समितीचे अध्यक्ष आमदार सरदार तारासिंग,चहल सिंग,प्रेमज्योतसिंग चहल,अमरीक सिंग वासरीकर,शेरसिंग फौजी,गुरूंदर सिंग बावा,एकबाल सिंग सबलोक आदी उपस्थित होते श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त …

Read More »

’ राम ’ च्या रूपाने भाजपचा ‘रावणी’ चेहरा समोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी घाटकोपर येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात भाजप आमदार राम कदमांच्या रुपाने ‘रावणी’ चेहरा समोर आल्याची जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींचे हरण करण्याची भाषा केल्यानंतर आज यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राम कदमांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात …

Read More »

…आणि रामदास आठवलेंनी दिलेला शब्द पाळला महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या अध्यक्षपदी राजा सरवदे यांची नियुक्ती

सोलापूर : प्रतिनिधी मागील एक आठवड्यापूर्वी सोलापूर येथील जाहीर कार्यक्रमात रिपाई (ए) चे पदाधिकारी राजा सरवदे यांना मंत्रीपद दिल्याशिवाय सोलापूरात पाऊल ठेवणार नसल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. त्यास एक महिन्याचाही कालावधी लोटत नाही, तोच सोलापूरकरांना दिलेला शब्द खरा करून दाखविल्याने दलित चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये समाधानाची भावना …

Read More »

आता खाजगी धर्मादाय संस्थांनाही मिळणार सरकारी जमिन राज्य सरकारकडून लवकरच धोरण जाहीर होणार

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारच्या मालकीच्या भूखंड वाटपात होत असलेल्या घोटाळ्यांना लगाम घालण्यासाठी लवकरच एक पारदर्शी धोरण जाहीर करण्यात येणार आहे. या धोरणान्वये सरकारी मालकीचे भूखंड वाटप करताना त्या त्या जिल्ह्यातील सर्वच खासगी धर्मादाय संस्थांना संधी देण्याचा विचार सरकारकडून करण्यात येत असल्याची माहिती महसूल विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. मागील काही …

Read More »

पक्षाचे नेते आले म्हणून अनेकांना प्रश्न सुचत होते अजित पवारांचा शिवसेनेला आदीत्य ठाकरेंवरून चिमटा

नागपूरः प्रतिनिधी तब्बल तीन दशकानंतर विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पहिल्यांदाच नागपूरात होत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांचा कामकाज पाहण्यासाठी आणि त्यांचा आक्रमकपणा बघण्यासाठी शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांनी आज विधानसभेत हजेरी लावत काही काळ सभापतींच्या गँलरीत बसून कामकाज पाहिले. नेमका हाच मुद्दा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी काही पक्षाचे युवा …

Read More »

शिवसेना नेते आदीत्य ठाकरेंच्या उपस्थितीने सेना आमदारांमध्ये आले हत्तीचे बळ आमदारांचे कामकाज पाहण्यासाठी ज्यु.ठाकरेंची विधानसभेत उपस्थिती

नागपूरः प्रतिनिधी विधानसभेचे सुरु असलेले पावसाळी अधिवेशनातील शिवसेना आमदारांच्या कामाची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे नेते आदीत्य ठाकरे हे स्वःजातीने उपस्थित राहीले. त्यामुळे सेनेच्या सर्वच आमदारांनी विधानसभेत आवर्जून उपस्थिती दाखवित आपल्या अंगात आलेले हत्तीचे बळही आक्रमक पध्दतीने दाखविला. सकाळी विधानसभेचे कामकाज सुरु होताच सभागृहाच्या आमदार-खासदारांच्या गँलरीत शिवसेना नेते आदीत्य ठाकरे आणि त्यांच्यासोबत …

Read More »

भुजबळांना शिवीगाळ, माज आलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अजित पवार यांच्यासह काँग्रेस, शिवसेनेची विधानसभेत मागणीः कामकाज तहकूब

नागपूरः प्रतिनिधी नुकतेच जामिन सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या उपरोक्ष श्रीगोंदा येथील पोलिस उपनिरिक्षक महावीर जाधव यांनी शिवीगाळ केली. लोकप्रतिनिधींना अशा पध्दतीने शिवीगाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना माज आलाय का? कशामुळे शिवीगाळ करतोय असा सवाल करत माज आलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत …

Read More »

अखेर भातखळकर यांना सभागृहाची समज विरोधक आणि शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेपुढे सरकारची माघार

नागपूर : प्रतिनिधी विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या मुद्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे अखेर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज २० मिनिटासाठी तहकूब करत सर्वपक्षिय नेत्यांच्या उपस्थितीत अतुल भातखळकर यांना समज देत याविषयावर पडदा टाकला. विरोधकांबरोबर शिवसेनेच्या सदस्यांनी भातखळकर यांच्या वक्तव्यावर आक्षेप …

Read More »