Breaking News

राजकारण

तीन वर्षाच्या अपयशी कारभारातून स्वत:ला वाचवण्यासाठी भाजप सत्तेबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी केंद्र आणि राज्य सरकार काश्मीरमध्ये शांतता राखण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहेत त्यातून स्वत:ला वाचवण्यासाठी भाजपाने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.  जम्मू-काश्मीरमधील पीडीपीसोबतची युती तोडण्याचा निर्णय भाजप सरकारने आज घेतला त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी भाजपावर …

Read More »

शिवसैनिकांनो फक्त मतच नाहीतर मनही जिंकायचं शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांचा निर्धार

मुंबई : प्रतिनिधी आगामी निवडणूका कधीही लागू शकतात. त्यामुळे शिवसेनेने केलेली कामे जनतेपर्यंत घेवून जायची असल्याने फक्त जनतेची मतेच नाहीतर मनही जिंकायची अशी घोषणा राज्यात एकहाती सत्ता आणण्यासाठी स्वबळावर निवडणूका लढायच आणि जिंकायचच असा निर्धार शिवसेनेचे युवा नेते आदीत्य ठाकरे यांनी केले. शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात गोरेगांव …

Read More »

राज्यातील सर्व शाळांमध्ये दर महिन्याच्या २१ तारखेला योग दिन साजरा होणार शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली असून या दिवशी ‘योग दिन’ साजरा केला जातो. महाराष्ट्रातही शाळा महाविद्यालयात यादिवशी ‘योग दिन’ साजरा केला जात असताना, दर महिन्याच्या २१ तारखेला योगासाठी स्वतंत्र वेळ राखून ठेवावा, अशा सूचना शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. आज सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तावडे यांनी राज्यभरातील क्रीडा …

Read More »

आरक्षणवादी आणि आरक्षण विरोधी गटात दंगल घडविण्याचा सरकारचा प्रयत्न भारिपचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात हिंदू व मुस्लिम अशी धार्मिक दंगे होत नाहीत. त्यामुळे आरक्षणवादी आणि आरक्षण विरोधी यांच्यात जातीय दंगली घडविण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी आज बुधवारी केला. भिमा कोरेगांव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात एल्गार परिषदेच्या नेत्यांना अटक करण्याचे सत्र राज्य …

Read More »

मोदी सरकार देशातील गरिबांची लूट करुन श्रीमंतांचे खिसे भरतेय नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण देशात महाआघाडी असावी अशी देशातील जनतेची भावना असून देशातील सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. तसेच सर्व पक्ष पंतप्रधान मोदी आणि भाजप आणि आरएससच्या कारभाराच्या विरोधात एकवटले आहेत. केवळ राजकीय पक्षच नाही तर जनतेमध्येही सरकारविरोधी भावना आहे. या भावनेला जोडण्याचे काम कॉग्रेस करत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे अध्यक्ष …

Read More »

मागण्या मान्य करा अन्यथा सरकारविरोधात असहकार शेतकऱ्यांनंतर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी सातवा वेतन आयोग त्वरीत लागू करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता थकबाकीसह रोखीने द्यावा यासह विविध मागण्यांच्या प्रश्नी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्यावतीने मंत्रालयासमोर आज दुपारी आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर मंत्रालयातील सरकारी कर्मचारी सहभागी झाले …

Read More »

२०१९ च्या निवडणूकासाठीच विनोद तावडे यांच्याकडून नाट्यसंमेलनाचा राजकिय वापर नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर यांचा आरोप : संमेलनाआधीच “वस्त्रहरणास” सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी उद्या बुधवारी अखिल भारतीय नाट्यसंमेलनास सुरुवात होत असतानाच मागील चार वर्षांपासून एकाही नाट्य समेंलनाला उपस्थित न राहणारे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे हे यावर्षी मुद्दाम हजर रहात आहेत. तसेच आगामी निवडणूकाच्या निमित्ताने जनसंपर्क अभियान मोहीमेचा भाग म्हणून ते हजर रहात असल्याचा आरोप नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर यांनी केला आहे. …

Read More »

शरद पवारांची रणनीती बीडमध्ये निष्प्रभ ठरल्याने सुरेश धस विजयी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंना लगाम

बीड : प्रतिनिधी विधान परिषदेसाठीच्या बीड-लातूर आणि उस्मानाद जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील जागेसाठी झालेल्या निवडणूक राज्याच्या दृष्टीने औस्तुक्याचा विषय ठरली. ही जागा निवडूण आणण्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाचे उमेदवार अशोक जगदाळे यांना भाजपचे उमेदवार सुरेश धस यांच्या विरोधात निवडूण आणण्यासाठी …

Read More »

मोदी सरकारचा ठेका पध्दतीचा निर्णय ‘संघाचा हेर’ मंत्रालयात बसवण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी प्रशासकीय सेवेत अधिकाऱ्यांची ठेका पध्दतीने भरती करण्याचा मोदीसरकारने घेतलेला निर्णय कुठेतरी संघाचा हेर मंत्रालयामध्ये बसवण्यासाठी आहे. देश लुटण्यासाठी संघाला थेट युपीएससीच्या माध्यमातून तिकडे जाता येत नाही. त्या विशेष जागेवर बसवता येत नाही. त्यासाठीच या सरकारने हा नवीन मार्ग शोधला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब …

Read More »

मागासवर्गीयांच्या भरतीच्या चौकशीच्या मागणीसाठी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न मुख्य प्रवेशद्वारासमोर रॉकेल ओतून घेतले

मुंबई : प्रतिनिधी धुळे शहर महानगरपालिकेत १९८९ साली मागासर्गीयांची भरतीची सीआयडी मार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी धुळे जिल्ह्यातील रहिवासी बबन यशवंत झोटे या व्यक्तीने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्वत:वर रॉकेल ओतून घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हालचाल करून झोटे यास आत्महत्येपासून परावृत्त केले. महानगरपालिकेत सरळसेवा भरतीच्या माध्यमातून मागासवर्गीयांची झालेल्या …

Read More »