Breaking News

राजकारण

सहकारी मंत्र्याचे निधन होवूनही मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटने करत भावनाशून्यतेचे प्रदर्शन तंबाखू विरोधी प्रदर्शनाला भेट देत इलेक्ट्रीक वाहनांचे उद्गाटन केले

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे कृषी मंत्री पांडूरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाला काही तासांचा अवधी लोटत नाहीत तोच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राज्यात दुखवटा जाहीर करण्याऐवजी मंत्रालयाच्या दालनात उद्घाटने आणि प्रदर्शनांना भेटी देत आपल्या भावना शुन्यतेचे जाहीर प्रदर्शन केले. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळातील सहकारी मंत्र्याचे निधन होवूनही मुख्यमंत्र्यांनी दाखविलेल्या …

Read More »

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा नेता गेला कृषी मंत्री पांडूरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज आणि राज्याचे कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज पहाटे ४.३५ वाजता सोमय्या रूग्णालयात निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार असून उद्या सकाळी ११ वाजता त्यांच्यावर त्यांच्या खांमगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. …

Read More »

राष्ट्रवादीच्या मोहीते-पाटील साम्राज्याला मोठा धक्का सोलापूर जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त

मुंबई : प्रतिनिधी गेली अनेक वर्षे सोलापूर जिल्हा बँकेवर सत्ता असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या गटाचे संचालक मंडळच बरखास्त करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मोहिते-पाटील गटाला मोठ्या प्रमाणावर धक्का बसला असून या बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सहकार विभागातील विश्वसनीय …

Read More »

प्रत्येक बुथवरील भाजपच्या पगारी कार्यकर्त्यांचा काँग्रेसचा कार्यकर्ता पराभव करेल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा विश्वास

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचा कार्यकर्ता प्रत्येक बुथवरील भाजपच्या पगारी कार्यकर्त्यांचा पराभव करेल असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. चव्हाण यांनी व्यक्त केला. खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज टिळक भवन, दादर येथे बुथ कमिट्यांच्या विधानसभा समन्वयकांची बैठक पार पडली. सदर बैठकीला राज्यभरातील २८८ विधानसभा मतदारसंघाचे बुथ कमिटी …

Read More »

मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इफ्तार पार्टी पार्टीला उद्योगपती, सिनेतारका, राजकारणी उपस्थित राहणार

मुंबई : प्रतिनिधी आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत भाजपला विजय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने पुढाकार घेतला असून मुस्लिम समाजबांधवाचा पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंच या संघटनेच्यावतीने मुंबईत पहिल्यांदाच रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. ही इफ्तार पार्टी ४ जून रोजी …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसचं पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली अणुशक्तीनगर-चेंबूर ते गोवंडीदरम्यान काढली आक्रोश रॅली

मुंबई : प्रतिनिधी मोदी सरकार होश मे आओ… फेकू सरकार हाय हाय…नरेंद्र मोदी सरकार हाय हाय… या सरकारचं करायचं काय…खाली डोकं वर पाय… पेट्रोल-डिझेल दरवाढ करणाऱ्या सरकारचा निषेध असो… अशा गगनभेदी घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यउपाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अणूशक्तीनगर-चेंबुर आणि गोवंडी परिसर …

Read More »

घातक शस्त्रे विकणाऱ्या फ्लिपकार्टवर बंदी घाला विरोधी पक्षनेते विखे पाटील यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर घातक शस्त्रांची विक्री होत असल्याचे औरंगाबाद शहरात नुकत्याच सापडलेल्या शस्त्र साठ्यांवरून स्पष्ट झाले. फ्लिपकार्टवर सरकारने तातडीने बंदी घालावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. औरंगाबाद शहरात झालेल्या दंगलीनंतर शहर हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच फ्लिपकार्ट या ऑनलाईन वेबसाईटवरून तलवारी, चाकू, गुप्ती, कुकरी, जांबिया अशी …

Read More »

पालघर वगळता भंडारा-गोंदियातील ४९ ठिकाणी फेर मतदान निवडणूक आयोगाला अखेर उपरती

मुंबई : प्रतिनिधी भंडारा -गोंदिया मतदार संघात ४९ मतदान केंद्रावर उद्या फेरमतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे . पालघर आणि भंडारा – गोंदिया लोकसभा पोट निवडणुकीसाठी  काल मतदान पार पडले , मात्र या मतदानात अनेक ठिकाणी मतदान यंत्र नादुरुस्त झाल्याने फेरमतदान घेण्याची मागणी राजकीय पक्षांनी केली होती . तर अनेक …

Read More »

भाजपची शिवसेनेबरोबर युती राहयला हवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर नितीन गडकरी यांचे मत

मुंबई : प्रतिनिधी आमची शिवसेनेसोबत युती आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आमची युती आहे. कधी तरी थोडेफार इकडे तिकडे होते. तुझे माझे जमेना तुझ्याविना करमेना, अशी मराठीत म्हणच आहे. आमचेही थोडेफार तसेच आहे. युती आहे आणि ती राहिली पाहिजे, असे मत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  नितीन …

Read More »

उच्च शिक्षणाच्या संस्थांना रुसाकडून ३४० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान परिषद (रुसा परिषद) ने राज्याच्या उच्च शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठीचा बृहत आराखडा तयार केला असून, या आराखड्यामध्ये महाविदयालयांची स्वायत्तता, स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठाचा दर्जा देणे, महाविद्यालयांच्या गटाला क्लस्टर (समूह) विद्यापीठाचा दर्जा देणे, संशोधन, नवोपक्रम, अध्ययन, अध्यापनाच्या पध्दतीतील गुणवत्ता वाढ मूल्यमापनाच्या नवनवीन पध्दती आदींवर …

Read More »