Breaking News

राजकारण

भाजपची शिवसेनेबरोबर युती राहयला हवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर नितीन गडकरी यांचे मत

मुंबई : प्रतिनिधी आमची शिवसेनेसोबत युती आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आमची युती आहे. कधी तरी थोडेफार इकडे तिकडे होते. तुझे माझे जमेना तुझ्याविना करमेना, अशी मराठीत म्हणच आहे. आमचेही थोडेफार तसेच आहे. युती आहे आणि ती राहिली पाहिजे, असे मत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  नितीन …

Read More »

उच्च शिक्षणाच्या संस्थांना रुसाकडून ३४० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान परिषद (रुसा परिषद) ने राज्याच्या उच्च शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठीचा बृहत आराखडा तयार केला असून, या आराखड्यामध्ये महाविदयालयांची स्वायत्तता, स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठाचा दर्जा देणे, महाविद्यालयांच्या गटाला क्लस्टर (समूह) विद्यापीठाचा दर्जा देणे, संशोधन, नवोपक्रम, अध्ययन, अध्यापनाच्या पध्दतीतील गुणवत्ता वाढ मूल्यमापनाच्या नवनवीन पध्दती आदींवर …

Read More »

चाचा चौधरी पुस्तकातून पंतप्रधान मोदी, चाचा नेहरुंची जागा घेवू शकत नाही राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बनवण्यासाठी जाहिरातीवर सुमारे चार हजार शंभर कोटी रुपये खर्च करण्यात आले परंतु त्यातून मोदींची प्रतिमा बनली ना लोकप्रियता वाढली त्यामुळे आता त्यांनी चाचा चौधरी पुस्तकाच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये आपली लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते …

Read More »

वारकऱ्यांसाठी पंढरपूरच्या बाहेर चारी बाजूला मोठ्या व्यवस्था उपलब्ध करणार सार्वजनिक आरोग्यमंत्री विजय देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी आषाढी वारी आणि कार्तिक वारीच्या निमित्ताने पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्य भरातून मोठ्या प्रमाणावर वारकरी येतात. या वारकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा पुरविण्याचा प्रयत्न असतो. मात्र तरीही वारकऱ्यांमुळे शहरातील पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर ताण पडतो. त्यामुळे वारकऱ्यांना मुबलक प्रमाणात सोयी-सुविधा मिळाव्यात आणि त्यांची तात्पुरती निवाऱ्याची सोय व्हावी यासाठी पंढरपूर …

Read More »

ईव्हीएम मशिन्स बंद पडल्या तरी पालघर-भंडाऱ्यात फेरमतदान नाहीच निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

मुंबई: प्रतिनिधी पालघर आणि भंडारा गोंदिया मध्ये अनेक ठिकाणी मतदान यंत्रे (ईव्हीएम्स) आणि व्हीव्हीपीटीएस यंत्रे काही तांत्रिकी कारणामुळे नादुरूस्त झाली असल्याने विविध राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी केली. मात्र आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून कुठेही फेरमतदान घेण्यात येणार  नसल्याचे निवडणूक आयोगाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट केले. काही ठिकाणी …

Read More »

काय चाललंय या सरकारचं पालघर,भंडारा-गोंदीया निवडणूकीतील मतदान प्रक्रियेप्रकरणी प्रवक्ते मलिक यांचा संतप्त सवाल

मुंबई: प्रतिनिधी पालघर,भंडारा-गोंदियामध्ये मशीनचा गैरवापर करत सरकार निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील लोकसभा निवडणूकीमध्ये याप्रकारच्या तक्रारी येत आहेत त्यावेळी उत्तरप्रदेशच्या गैरानामध्येसुध्दा ३०० मतदान केंद्रावर मतदान होवू शकले नाही. २५ टक्के भंडाराच्या मतदान केंद्रावर मतदान करता आले नाही. पालघरमध्येसुध्दा तीच परिस्थिती आहे. काय चाललंय या सरकारचं…असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झालेल्या मतदान केंद्रावर फेरमतदान घ्या मतमोजणीवेळी व्हीव्हीपँटच्या स्लीपचीही मोजणी करा

मुंबई : प्रतिनिधी पालघर व भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी या दोन्ही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली. भंडारा-गोंदिया मतदारसंघात तर जवळपास २५ टक्के ईव्हीएम आणि व्हीव्हीपँट यंत्रामध्ये बिघाड झाल्याने तासन् तास रांगेत उभे राहूनही मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. ज्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला त्या सर्व …

Read More »

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठीही साम ,दाम ,दंड भेदाची भूमिका घ्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : प्रतिनिधी पालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकीत साम , दाम, दंड  आणि भेदाची भूमिका मांडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दररोज वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींना कमी करण्यासाठीही हीच भूमिका घ्याल का? असा उपरोधिक सवाल करत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. एकीकडे पालघर लोकसभेच्या पोट निवडणुकीचे मतदान सुरु असतानाच आदित्य ठाकरे यांनी पेट्रोल …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात युतीबाबतची चर्चा फक्त उद्धव ठाकरे यांच्यासोबतच सेनेतील अन्य नेत्यांना महत्व नाही

मुंबई : प्रतिनिधी पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत आणि विधान परिषदेच्या निवडणूकीत भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी टोकाची टीका करूनही शिवसेनेबरोबर युती करण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविली आहे. तसेच आगामी निवडणूकीच्या निमित्ताने फक्त उध्दव ठाकरे यांच्यासोबतच चर्चा करणार असल्याचे सांगत शिवसेनेचा कोणताही नेता काहीही बोलत …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी पालघर निवडणुकीत किती लोकांना दाम आणि दंड दिला? याची चौकशी करून कारवाईची मागणी : काँग्रेसची निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल

साम, दाम, दंड, भेदाचा वापर करू असे म्हणणा-या मुख्यमंत्र्यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत किती लोकांना दाम आणि दंड दिला? तसेच कुठे भेद केला ? याची चौकशी करून कारवाई करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिप संदर्भात काँग्रेससह बहुपक्षीय शिष्टमंडळाने निवडणूक निर्णय अधिका-यांची भेट …

Read More »