Breaking News

राजकारण

बहुत हुई महंगाई की मार, लूटमार करो बंद मोदी सरकार पेट्रोल दरवाढीच्या विरोधात प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने पेट्रोल व डिझेलवर अन्याय्य कर लादल्यामुळे देशात इंधनाच्या किंमती उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत आहे. केंद्र आणि राज्य सरकार इंधनावर अवाजवी कर आकारणी करून जनतेची लूट करित आहे. इंधनावरील हे अन्यायी कर आणि अधिभार …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आमदारांचे तीन तास मंत्रालयातच ठिय्या आंदोलन आसिफ शेख, अब्दुल सत्तार, अबु आझमी, इम्तियाज जलिल, वारीस पठाणचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी औरंगाबाद दंगलीतील प्रमुख संशयितांचे व्हीडीओ फुटेज पुराव्या दाखल  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पार्टी, एमआयएम आदी पक्षाच्या पाच मुस्लिम आमदारांनी वेळ मागितला. मात्र मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी भेटीची वेळ नाकारल्याने काँग्रेसचे आमदार आसिफ शेख, अब्दुल सत्तार, समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल, वारीस पठाण …

Read More »

भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी तीन जागांचे भवितव्य पेटी बंद विधान परिषदेसाठी ९९.८१ टक्के मतदान

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडूण येणाऱ्या सहा जागांसाठी आज मतदान झाले. या सहा जागांवर भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी तीन उमेदवार उभे करण्यात आले. त्यामुळे तीन जिल्ह्यांच्या एका मतदारसंघानुसार तीन मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यातच या निवडणूकीकरीता ९९.८१ टक्के मतदान झाले. त्यामुळे या …

Read More »

`एक देश, एकच शिधापत्रिका’ मोहिमेसाठी प्रयत्न अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शिधावाटप केंद्रांवर ई-पॉसद्वारे धान्य वितरण प्रणाली लागू केल्यामुळे राज्यात एखादा शिधापत्रक धारक कोठेही एकदाच धान्य घेऊ शकतो. त्यामुळे राज्यातील एखाद्या व्यक्तीला एकच शिधापत्रक बाळगता येणे शक्य आहे. संपूर्ण देशात हीच पद्धत अंमलात यावी असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे देशभरात एक नागरिक, एकच शिधापत्रिका अंमलात येऊ शकेल, …

Read More »

राज्यात भाजप- शिवसेना सरकारची एकात्मिक फसवणूक योजना सुरु काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

पालघर : प्रतिनिधी गेली चार वर्षात विकासाची कोणतीही कामे केली नाहीत. त्यामुळेच मृत व्यक्तींचा वापर करण्याची वेळ भाजप आणि शिवसेनेवर आली आहे. एके ठिकाणी पालघर जिल्ह्याचा विकास हा सत्ताधा-यांमुळे आयसीयुमध्ये मरणासन्न अवस्थेत पडलेला आहे. तर दुसरीकडे भाजप शिवसेना हे दोन्ही पक्ष ऊर बडवून मतांचा जोगवा मागत असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र …

Read More »

लुटलेले हजारो कोटी वापरा पण पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा! विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी भाजप-शिवसेनेच्या केंद्र सरकारने आजवर ग्राहकांच्या खिशातून लुटलेल्या हजारो कोटी रूपयांमधून अनुदान द्यावे आणि पेट्रोल-डिझेलची महागाई कमी करावी, अशी मागणी करत पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दराबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. दररोज वाढणार्‍या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींसंदर्भात रोष व्यक्त करताना ते म्हणाले की, सततच्या भाववाढीसाठी केंद्र सरकारने सबबी सांगणे …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात मंत्रालयासमोर निदर्शने सरकारच्या नावाने भोपळा फोड आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भाजप सरकारने रोजगार उपलब्ध करून देणार, उद्योग आणण्याच्या घोषणा दिल्या. मात्र दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सरकारने दिलेल्या नसल्याच्या निदर्शनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सरकारविरोधात घोषणाबाजी करत भोपळा फोड आंदोलन केले. त्यामुळे प्रवेशद्वारावर असलेल्या पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. दरवर्षी बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणार, …

Read More »

अखेर सोलापूर विद्यापीठाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर‘ यांचे नाव उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थिती लिंगायत आणि धनगर समजाची साम्यंजसाची

मुंबई : प्रतिनिधी सोलापूर विद्यापीठाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर‘ यांचे नाव देण्यावरून सोलापूर जिल्ह्यात लिंगायत समाज आणि धनगर समाज आमने-सामने आला. तसेच विद्यापीठाला नाव देण्यावरून आणि न देण्यावरून या दोन्ही समाजाच्या नागरीकांनी धरणे आणि मोर्चे काढले. मात्र अखेर अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून ३१ मे २०१८ …

Read More »

कर्नाटकात आकड्यांच्या खेळातील अतिविश्वास भाजपला नडला येदीयुरूप्पा यांचा दोन दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

बंगरूळू-मुंबई : प्रतिनिधी नुकत्यात झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीत कर्नाटकी जनतेने सत्तेचा सोपान कोणत्याही पक्षाच्या हाती न देता ती त्रिशंकु अवस्थेत ठेवली. तरीही भाजप नेते येदीयुरप्पा यांनी सत्तेच्या सारीपटावरील आकड्यांचा खेळ जिंकण्यासाठी अतिविश्वास दाखवित सरकार स्थापनेसाठी दावा केला. त्यासाठी राज्यपाल वजूभाई वाला यांनी पूरक भूमिकाही घेतली. मात्र सत्तेच्या सारीपटावरील आकड्यांचा खेळ …

Read More »

कर्नाटकात लोकशाहीचा मोठा विजयाने देशातील राजकीय चित्र पालटणार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आशावाद

मुंबई : प्रतिनिधी लोकशाही धाब्यावर बसवून बळकावलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री पद भारतीय जनता पक्षाला अखेर सोडावे लागले असून, हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी केलेल्या खटाटोपातून भाजपचा लोकशाहीविरोधी चेहरा समोर आला असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊन देशभरातील राजकीय चित्र पालटणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी …

Read More »