Breaking News

राजकारण

सुप्रिया सुळे यांच्या आरोपामुळे माझा राजकिय भाव वाढला भाजप आमदार प्रसाद लाड यांचा उपरोधिक टोला

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी पक्षात असताना मला पवार साहेब नेहमी सांगायचे क आरोप झाले की तो माणूस मोठा होतो, या शरद पवार यांच्या सांगण्यानुसार आता माझ्यावर सुप्रिया सुळे यांनी आरोप केल्याने माझा राजकिय भाव वाढल्याचा दावा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला. तसेच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो, त्यावेळीही मी बिझनेस …

Read More »

उध्दव ठाकरे आपली घोषणा सार्थ ठरविणार ? विधान परिषद निवडणूकीत शिवसेनेचा फक्त एकच उमेदवार रिंगणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यात जरी भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार असले तरी भाजपवर जाहीर टीका करण्याची एकही संधी शिवसेनेकडून सोडली जात नाही. त्यातच आता कोकणातील नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संघर्षाची भूमिका घेतली आहे. मात्र विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ६ जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत असताना शिवसेना …

Read More »

६ जागांपैकी ३ जागा देणार असेल तरच राष्ट्रवादीशी आघाडी लातूरची जागा न देण्याबाबत काँग्रेस ठाम

मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेतील स्थानिक प्राधिकारी संस्था अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडूण आलेले ६ सदस्य निवृत्त होत आहेत. या निवृ्त्त सदस्यांमुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. मात्र या निवडणूकीत काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचे जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या कोट्यातील रिक्त होणाऱ्या तीन जागांबरोबरच चवथी जागा काँग्रेसकडे मागितली आहे. …

Read More »

अखेर भाजपमध्ये उपेक्षित असलेल्या माधव भांडारी यांना मिळाला मंत्री पदाचा दर्जा महाराष्ट्र राज्य पुर्नवसन प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी गेली अनेक वर्षे कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता भारतीय जनता पार्टीचे इमाने इतबारे काम करणाऱ्या पक्षाचे प्रवक्त माधव भांडारी यांना दोन वेळा आमदारकीची हुलकावणी मिळाल्यानंतर अखेर मंत्री पदाचा दर्जा मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यांना महाराष्ट्र राज्य पुर्नवसन प्राधिकरण तथा राज्य पुर्नवसन व पुर्नस्थापना संनियंत्रण समितीच्या उपाध्यक्ष पदी …

Read More »

सण-सुद आणि सुट्टीच्या काळात प्रवाशांची होणारी लुबाडणूक थांबणार खासगी प्रवासी वाहनांच्या अमर्याद भाडेवाढीवर नियंत्रण आणण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी गर्दीच्या हंगामाच्या काळात राज्यातील खासगी प्रवासी वाहने (बस, ट्रॅव्हल्स इत्यादी) त्यांच्या तिकीटदरात मोठ्या प्रमाणात अवाजवी वाढ करतात. मोठ्या गर्दीच्या काळात ही वाढ अनेकपट असते. यामुळे प्रवाशांची होणारी लुबाडणूक थांबविण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार खासगी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानुसार या खासगी कंत्राटी वाहनांना आता …

Read More »

१० वीच्या पुस्तकातील तो नकाशा नाहीच तर ती केवळ प्रतिमा पाठ्यपुस्तक मंडळाचा खुलासा

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक आणि संशोधन मंडळाने १० वीच्या तयार केलेल्या पाठ्यपुस्तकात जम्मू काश्मीरचा जो नकाशा दाखविण्यात आला त्यामधील बराचसा भाग देशाच्या सीमेबाहेर दाखविण्यात आल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. त्यास तात्काळ पाठ्यपुस्तक मंडळाने त्यावर तात्काळ खुलासा करत तो नकाशा नसून अद्यावयत तंत्रज्ञानाने तयार केलेली …

Read More »

विधान परिषदेच्या तीन जागा निवडूण आणण्यासाठी राष्ट्रवादीची काँग्रेस सोबत आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणार असल्याची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी येत्या मे  महिन्यात रिक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन ठिकाणी उमेदवार उभे करण्यात येण्याची शक्यता आहे. उपलब्ध संख्याबळानुसार कॉंग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडूण येण्याची शक्यता आहे. मात्र कॉंग्रेसच्या वाट्याची एक जागा आणखी मागून तीन ठिकाणी उमेदवार देण्याची रणनीती राष्ट्रवादीची …

Read More »

आगामी निवडणुकांच्या खर्चासाठी भाजपने मुंबई बिल्डरांना विकण्यास काढली काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी मुंबईचा विकास आराखडा हा मुंबईकरांचा विश्वासघात करणारा असून मुंबईकरांचे जीवन भविष्यात अधिक दुष्कर होईल अशी भीती व्यक्त करत कर्नाटक व २०१९ च्या निवडणुकीचा खर्च काढण्यासाठी भाजपने मुंबई विकायला काढल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. मुंबई येथे पत्रकार परिषदेला संबोधीत करताना …

Read More »

देशप्रेमी सरकारच्या शिक्षण विभागाने जम्मू-काश्मीरचा मोठा भाग दिला पाकिस्तानला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची दोषींना अटक करण्याची मागणी

मुंबई : प्रतिनिधी देशप्रेमाचे आणि पारदर्शक कारभाराच्या वचनांचे गो़डवे गात सत्तेवर आलेल्या भाजप सरकराच्या शिक्षण विभागाने नुकत्याच काढलेल्या दहावीच्या नवीन पाठ्यपुस्तकात भारताचा सदोष नकाशा व राष्ट्रध्वज प्रकाशित करण्यात आला आहे. या पुस्तकातील भारताच्या नकाशातून जम्मू व काश्मीरचा मोठा भूभाग देशाच्या सीमेबाहेर दाखवण्यात आला असून, या गंभीर प्रकणी सरकारने संबंधितांविरूद्ध गुन्हे दाखल …

Read More »

एसटी महामंडळात नव्याने रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार पूर्ण पगार परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

मुंबई  : प्रतिनिधी एसटी महामंडळामध्ये भरती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सध्या १ वर्षापर्यंत कनिष्ठ वेतन श्रेणीवर काम करावे लागते. ही कनिष्ठ वेतनश्रेणीची पध्दत रद्द करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. या निर्णयाचा लाभ नव्याने भरती होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना होईल असेही त्यांनी सांगितले. मंत्री रावते म्हणाले, एसटी महामंडळात भरती होणाऱ्या …

Read More »