Breaking News

राजकारण

शिवसेनेचा नाणारला विरोध म्हणजे डील मोदी ‘व्हीलन’ शिवसेना कोण? ‘साइड व्हीलन’! विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी उद्धव ठाकरे मोदींना व्हीलन म्हणतात. मग मागील साडेतीन वर्ष केंद्रात आणि राज्यात त्यांचा जो डर्टी पिक्चर सुरू आहे, त्यात शिवसेनेची भूमिका काय आहे? मोदी व्हीलन असतील तर उद्धव ठाकरेंना साइड व्हीलनच म्हणावे लागेल, असा घणाघाती टीका करत नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध म्हणजे भाजपबरोबरील डील असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण …

Read More »

नाणारची अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार उद्योगमंत्री देसाईंना नाहीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून शिवसेनेच्या घोषणेतील घेतली हवा काढून

मुंबई : प्रतिनिधी नाणार येथील रिफायनरी प्रकल्पावरून स्थानिक रहिवाशी आंदोलनाच्या पावित्र्यात उभे राहीले आहेत. बहिष्काराच्या भीतीपोटी राज्याचे उद्योग मंत्री तथा शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी जमिन संपादनाची ती अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय जाहीर सभेत केला. मात्र त्यात्र त्यास काही तासांचा अ‌वधी उलटत नाही तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती अधिसूचना …

Read More »

नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द हा शिवसेनेचा पब्लिसिटी स्टंट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा शिवसेनेचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. शिवसेनेने आज नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत जाहीर केलेल्या भूमिकेवर नवाब मलिक यांनी सडकून टिका केली. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर सभेत आज नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची …

Read More »

पैशाची मस्ती इथे चालणार नाही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा

नाणार : प्रतिनिधी कोकणातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत सगळेच जण शिवसेनेची भूमिका काय विचारतात. त्या सर्वांना सांगतो की नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असून हा प्रकल्प तरीही इथे आला तर त्याची राख करू असा सज्जड दम राज्य आणि केंद्र सरकारला दिला.  पैशाच्या बळावर येतील शेतकऱ्यांची जमिन खरेदी करून सौदी अरेबियाच्या …

Read More »

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी शरद पवार यांची फेरनिवड होणार अर्ज दाखल ३० एप्रिल रोजी अध्यक्षपदाची प्रक्रिया पार पडणार

मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी शरद पवार यांचा अर्ज आज पक्षाच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकारी आणि पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस मास्टर पितांबर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. मात्र राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आतापर्यंत फक्त शरद पवार यांचाच अर्ज पक्षाकडे आला आहे. त्यामुळे ३० …

Read More »

सरकारी दबावामुळेच असीमानंद, कोडनानी यांची सुटका कट्टरतावादी धर्मांध संघटना आणि लोकांबाबत सरकारचे जाणिवपूर्वक बोटचेपे धोरण : खा. अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात सीबीआयने अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्याकरिता दाखवलेली असमर्थतता अतिशय संतापजनक असून तपास यंत्रणा सरकारच्या प्रचंड दबावाखाली काम करित आहेत. कट्टरतावादी धर्मांध संघटनांच्या बाबतीत भाजप सरकारने जाणिवपूर्वक घेतलेले बोटचेपे धोरण याला कारणीभूत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. …

Read More »

भविष्यकाळातील कोणत्याही निवडणूकीत भाजपा-शिवसेना युती नाहीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत शिवसेनेबरोबरील युती कायम रहावी यासाठी भाजपकडून शिवसेनेला चुचकारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र शिवसेनेकडून स्वबळावर निवडणूका लढविण्याचा निर्धार कायम असतानाच यापुढे भविष्यातील कोणत्याही निवडणूकीत युती करणार नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले. त्यामुळे भाजप आणि शिवसेने दरम्यान युती होणार नसल्याचे यानिमित्ताने …

Read More »

न्या. लोयांच्या निधनावरून राजकारण करणाऱ्या राहुल गांधींनी देशाची माफी मागावी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी न्या. लोया यांच्या निधनावरून राजकीय कारस्थान करण्याचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा डाव सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे उघड झाला असून राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये गुरुवारी केली. रावसाहेब पाटील- दानवे पुढे म्हणाले की, या विषयावरून …

Read More »

मुख्यमंत्री खोटारडे…म्हणे महाराष्ट्र हागणदारी मुक्त फडणवीस म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल : खा. अशोक चव्हाण यांचा आरोप

नांदेड : प्रतिनिधी राज्य हागणदारीमुक्त झाले आहे, असा नविन दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असून, ग्रामीण भागात जाऊन त्यांनी स्वतः परिस्थिती पाहावी, फडणवीस म्हणजे खोटे बोल पण रेटून बोल असा सणसणीत टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. पोकळ घोषणा करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या …

Read More »

न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यू प्रकरणी अर्थमंत्र्यांच्या मेव्हूण्याची नार्को टेस्ट करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी न्यायमुर्ती ब्रिजमोहन लोया यांच्या संशयित मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळण्यात आली. मात्र न्या. लोया यांचे पोस्ट मार्टेम करणारे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मेव्हुणे डॉ.मकरंद व्यवहारे यांची नोर्को टेस्ट करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. बँलार्ड पिअर्स येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात …

Read More »