Breaking News

राजकारण

भिडेमुळे सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा आहे का ? विधान परिषदेत धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल

मुंबई : प्रतिनिधी भीमाकोरेगाव प्रकरणाच्या दंगलीमधील आरोपी एकबोटे स्वत:हून अटक झाला. मात्र दुसरा आरोपी संभाजी भिडे याला अटक करण्यात आली नाही याचा अर्थ सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला. संभाजी भिडेला अटक होत नाही तोपर्यंत असे मोर्चे निघणार आहेत. संभाजी भिडे …

Read More »

एल्गार मोर्चाचे विधानसभेत पडसाद भिडेला पाठीशी घालत असल्याचा विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगांव प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे या दोघांची नावे एफआयआर मध्ये आहेत. त्यातील मिलिंद एकबोटे याला अटक करण्यास अडीच महिने लागतात. तर संभाजी भिडे सगळीकडे फिरत असून पत्रकार परिषदा घेवून वावरतो. मात्र राज्य सरकारला तो सापडत नाही. यावरून राज्य सरकार भिडे यास पाठीशी घालत असल्याचे …

Read More »

पोलिस म्हणतात भिडेंच्या अटकेसाठी एल्गार मोर्चा नको, तर आंदोलन करा पोलिसांनी परवानगी नाकारल्याची अँड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगांव येथे विजयी स्तंभास मानवंदना देण्यासाठी गेलेल्या दलितांवर काही समाजकंटकांनी हल्ल्या केल्याच्या घटनेतील मुख्य सुत्रधार असलेल्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी दलित समाजाच्या विविध संघटनांकडून एल्गार मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र त्या मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकारत मोर्चा नाही तर आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी …

Read More »

आठवले म्हणतात जर संभाजी भिडे जबाबदार असेल तरच अटक करा भिडे अटकेवरून दलित नेत्यांमध्ये परस्पर विरोधी भूमिका

मुंबई : प्रतिनिधी १ जानेवारी रोजी भिमा कोरेगाव येथे झालेल्या दलितांवरील हल्ल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे याबरोबर संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यास अटक करण्याच्या मागणीवर भारिप बहुजन महासंघाचे नेते अँड.प्रकाश आंबेडकर आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा.जोगेंद्र कवाडे आग्रही आहेत. त्यासाठी कवाडे यांच्या पक्षाच्यावतीने मुंबईतील आझाद मैदानावर आज मोर्चा काढण्यात आला. …

Read More »

अँट्रॉसिटी निकालाच्या पुर्नविचारासाठी रिपाई सर्वोच्च न्यायालयात जाणार केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी अँट्रॉसिटीच्या गैरवापराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा कायद्याचा अवमान करणारा निर्णय आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) च्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी …

Read More »

विश्वास दर्शक ठरावाच्या विरोधात विरोधकांची राज्यपालांकडे तक्रार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापच्या सदस्यांनी घेतली भेट

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडून विरोधी बाकावरील सदस्यांना सापत्नपणाची वागणूक दिली जाते. त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव आणलेला असताना तो ठराव चर्चेला न घेता राज्य सरकारकडून त्यांच्यावर विश्वास दाखविणारा ठराव मांडत लोकशाही मुल्याची मोडतोड केल्याची तक्रार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेतील आमदारांनी राज्यपाल सी.विद्यासागर यांची भेट घेत केली. यावेळी काँग्रेसचे …

Read More »

अध्यक्षांवरील विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने सरकारकडून लोकशाहीचा खून विरोधकांचा राज्य सरकारवर आरोप

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत कामकाजाच्यावेळी अनेकदा मंत्री नसतात, प्रश्नांची उत्तरे दिली जात नाहीत. उत्तरे प्राप्त होत नाहीत. मंत्री नसल्याने उत्तरे, प्रश्न, लक्षवेधी पुढे ढकलायची पध्दत सर्रास सुरु होती. एककल्लीपणाने सभागृहाचे कामकाज चालविले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी करत केवळ या कारणामुळे …

Read More »

राज्य सरकारने विरोधकांचे तोंड दाबले अध्यक्षांवरील विश्वास दर्शक ठरावावर विरोधकांना बोलण्याची संधी नाकारली

मुंबई: प्रतिनिधी विधानसभेत विरोधकांना गाफील ठेवत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विश्वास दर्शक ठराव संमत केल्यावरून सभागृहात विरोधकांनी राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या आमदारांसह मंत्र्यांनी विरोधकांना बोलूच न देण्याची भूमिका घेतल्याने सभागृहात सत्ताधारी पक्षांकडून विरोधकांचे तोंड दाबल्याचे चित्र पाह्यला मिळाले. सत्ताधारी भाजप-शिवसेनेकडून अध्यक्षांवरील ठराव मंजूर करण्यात …

Read More »

चलाखीने अध्यक्षांवरील विश्वासदर्शक ठराव दोन मिनिटांत मंजूर राज्य सरकारची विरोधकांवर कुरघोडी

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे हेतूपुरस्सर वागत आणि पक्षपाती पध्दतीने वागत असल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला. मात्र विरोधकांचा ठराव चर्चेला येण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांवरील ठराव मांडत आणि तो आवाजी मतदानाने मंजूर करत गाफील विरोधकांवर राजकीय कुरघोडी …

Read More »

मंत्रालयातील उंदीर मारण्याचे विष पिऊन धर्मा पाटील यांची आत्महत्या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयात एका आठवड्यात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर मारल्याचे सांगत सभागृहात एकच हलकल्लोळ उडवून देत जिथे महापालिकेला सहा लाख उंदीर मारण्यासाठी दोन वर्षे लागतात तिथे सात दिवसांत या संस्थेने हा पराक्रम कसा साधला असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ ख़डसे यांनी विधानसभेत करीत हे उंदीर मारण्याचे …

Read More »