Breaking News

राजकारण

राज्याची महसूली तूट शुन्यावर आणणार आणखी ५-६ वर्षे काम करावे लागणार असल्याची अर्थमंत्री मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या महसूली उत्पन्नात १५ हजार कोटी महसुली तूट येणार असल्याचे जरी स्पष्ट असले तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी हा खर्च आहे. त्यामुळे ही तूट येणार असल्याचे सांगत महसुली तूट रकमेत मोजायची नसते. २००९-१० मध्ये महसुली तुटीची टक्केवारी ९४ टक्के होती ती आता ५५ टक्क्यांवर …

Read More »

भीमा-कोरेगाव प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद विरोधी पक्षनेते विखे पाटील यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी भीमा-कोरेगाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मिलिंद एकबोटेंचा जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली आहे. परंतु, भिडे गुरूजींविरूद्ध काहीच कारवाई का केली जात नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. एकबोटेंप्रमाणे भिडे गुरूजींवरही तातडीने कारवाई झाली पाहिजे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. एकबोटे यांच्या अटकेसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त …

Read More »

अर्थसंकल्पात फक्त आश्वासनांचे बुडबुडे अजित पवार यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या अर्थसंकल्पातून समाजातील सर्व घटकांना समप्रमाणात निधी मिळेल असे वाटले होते. मात्र सरकारने कोणत्याच घटकाला योग्य निधी ना न्याय दिल्याचा आरोप करत आरोग्य खात्याला निधीची कमतरता भासत आहे. सोय सुविधा नसल्याने नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. सर्वच खात्याची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे अर्थसंकल्प निराशाजनक असून फक्त आश्वासनांचे …

Read More »

भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी भिडे, एकबोटेंची नावे न घेता मुख्यमंत्र्यांचे उत्तर मात्र दलितांवरील बंदच्या काळातील खटले मागे घेण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेत विरोधकांनी मांडलेल्या ९३ अन्वये भीमा कोरेगांव येथील दंगलप्रकरणी प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावरील चर्चेस उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या दंगलीस कारणीभूत असलेल्या आणि अँट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा नोंदविलेल्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या दोन आरोपींच्या नावाचा उल्लेख करण्याचे टाळत या दोन्ही आरोपींना …

Read More »

कोल्हापूरपेक्षाही लहान त्रिपुरा जिंकले म्हणून हुरळून जाऊ नका, महाराष्ट्राच्या मातीत या मग दाखवतो जयंत पाटील यांचे भाजपला आव्हान

मुंबई : प्रतिनिधी ईशान्य भारतातील निवडणूकीत त्रिपुरा राज्यात विजय मिळविल्याचा जल्लोष भाजपकडून साजरा करण्यात येत आहे. मात्र त्रिपुरा राज्य आहे तरी केवढे असा उपरोधिक सवाल करत आमच्या कोल्हापूरच्या महानगरपालिकेचे आणि जिल्हा परिषदेचे मतदारसंघ मोठे आहेत. त्यामुळे अशा छोट्या मतदारसंघात विजय मिळविल्याने फार हुरळून जावू नका असा उपरोधिक टोला लगावत महाराष्ट्राच्या …

Read More »

भाजप सरकारच्या ३० हजार तासात १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांची सरकारवर टीका

मुंबई : प्रतिनिधी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला सत्तेत येवून ३० हजार तास झाल्याचा उल्लेख केला. आमच्या १५ वर्षाच्या कार्यकाळात आम्ही कधीच असे तास, सेंकद, मिनिटे मोजले नाहीत. मात्र अर्थमंत्र्यांनी मोजल्याने त्यांचे काही खरे दिसत नसल्याची उपरोधिक टीका करत तुमचे सरकार आल्यापासून राज्यातील १६ हजार …

Read More »

जेव्हा अध्यक्ष महाराज आमदारांची शाळा घेतात… भाजपच्या मुख्य प्रतोदांना अध्यक्ष बागडेंची ताकीद

मुंबई : बी.निलेश विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज भाजपचे आमदार आणि मुख्य प्रतोद राज पुरोहित यांना आपली जागा बदलण्यास मज्जाव घातला आणि काही मीनिटांसाठी आपण शाळेत आहोत की असा भास सर्वच आमदारांना झाला… घटना अशी घडली की… राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे हे विरोध पक्षांनी मांडलेल्या मराठी शाळांबाबतच्या २९३ अन्वये …

Read More »

शाळांचे समायोजन केले, बंद नाही शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा खुलासा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कमी पटसंख्या असेल्या १३०० शाळा बंद नाही तर त्यांचे १ किलोमीटर अंतराच्या परिसरातील इतर शाळांमध्ये समावेश करण्यात आलेले आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत असून त्यांच्या सहली, गँदरींग आदी गोष्टी होत असल्याने त्यांच्या अभ्यासाला गती मिळत असल्याचा दावा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला. तसेच या …

Read More »

दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठविल्याची अन्न व पुरवठा मंत्री बापट यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात दिवसेंदिवस दूध भेसळीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे ओरिसा, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा करावी अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी लक्षवेधी सूचनेच्या वेळी केली. त्यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट  म्हणाले की, याबाबत …

Read More »

शेतकऱ्यांच्या लाँगमार्चला यश शेतकऱ्यांना २००१ सालापासून कर्जमाफी देण्याचे सरकारचे मोर्चेकऱ्यांना आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी नाशिकहून मुंबईला काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या लाँगमार्चला राज्य सरकारकडून तितकाच प्रतिसाद मिळाल्यामुळे सोमवारी शेतकऱ्यांच्या जवळजवळ सर्व मागण्या मान्य झाल्या. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना २००१ सालापासून कर्जमाफी मिळणार असून कुटुंबातील सर्व खातेदारांची कर्जमाफी होणार आहे. नाशिकहून निघालेला हा लाँगमार्च मुंबईकरांची तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी रविवारी रात्रीच आझाद मैदानावर आला. …

Read More »