Breaking News

राजकारण

मराठी भाषा दिनीच मराठी शाळा बंद करण्याचे शिक्षण विभागाचे फर्मान दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करण्याची विखे-पाटील यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी नेमका मराठी भाषा दिनाचाच ‘मुहूर्त’ साधून जालना जिल्ह्यातील एक मराठी शाळा बंद करण्याबाबतचे सरकारी फर्मान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सभागृहात सादर करून मराठीबाबत सरकारचा कळवळा बेगडी असल्याचा ठपका ठेवला. विधीमंडळातील मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमातील सावळ्या गोंधळावर विरोधी पक्षांनी आज सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. या दरम्यान, …

Read More »

कमला मिल आगीचे खापर विरोधकांवर आगीस आघाडी सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील सर्व मिलच्या जागा महापालिका, म्हाडा आणि गिरणी कामगारांना समसमान पध्दतीने वाटप करण्याचा निर्णय सुरुवातीला घेतला. परंतु त्यात चालबाजी करत तेव्हाच्या सरकारने एकूण जागेऐवजी उर्वरित रिकाम्या जागेचे तीन भाग करून त्याचे समसमान वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्याच पध्दतीने कमला मिलच्या जागेबाबत निर्णय घेतला. त्यामुळे कमला मिल परिसरातील …

Read More »

शेतकरी कर्जमाफीवरून सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब कर्जमाफीची तात्काळ अंमलबजावणी करण्याची विरोधकांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. मात्र दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यानी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी आणखी वाढीव मुदत दिली. त्यामुळे या सरकारने जाहीर केलेली आकडेवारी फसवी असल्याने कर्जमाफीची तातडीने अंमलबजावणी करा अशी मागणी विरोधकांनी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यातच सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी …

Read More »

मराठी भाषेवरून राज्य सरकारवर पुन्हा नामुष्की समुह गीता दरम्यान स्पीकर बंद आणि सातवे कडवे वगळल्यावरून विरोधकांचे रणकंदन

मुंबई : प्रतिनिधी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांच्यावतीने सुरेश भट लिखित महाराष्ट्राच्या गौरव गीत गाण्यात आले. मात्र या समुह गीत कार्यक्रमा दरम्यान लाऊड स्पीकरच बंद पडण्याची घटना घडली. तसेच त्या गौरव गीतातील सातवे कडवे राज्य सरकारने वगळल्याने राज्य सरकारवर पुन्हा नामुष्कीची वेळ आली. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या …

Read More »

अनुवाद प्रकरणावरून विधान परिषदेत विरोधक आक्रमक महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची दिलगिरी

मुंबई :  प्रतिनिधी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी मराठी अनुवाद नसल्याच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. अखेर सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर विरोधक शांत झाले. विधिमंडळ सदस्यांच्या संयुक्त बैठकीपुढे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे अभिभाषण संपल्यानंतर त्यावरचे पडसाद विधान परिषदेत कामकाज सुरू होताच उमटले. कामकाजाला सुरूवात होताच …

Read More »

‘दादा – बाबा’चा एकाच गाडीतून प्रवास… राजकिय विरोधक असूनही एकाच गाडीतून प्रवास

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार क्वचितच एकत्र दिसतात. त्यातच पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील सिंचनाची श्वेतपत्रिका काढत त्यावेळी उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांची चांगलीच अडचण केली. त्यामुळे त्यांच्यात चांगलेच राजकिय शत्रुत्व निर्माण झाले होते. मात्र अजितदादा आणि पृथ्वीराज बाबा यांनी आज …

Read More »

राज्यपालांच्या भाषण अनुवाद वाचनाचे १० हजार कोणाला? श्रीपाद केळकर कि शिक्षण मंत्री तावडे यांना

मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल सी.विद्यासागर यांच्या अभिभाषण होते. या अभिभाषणाचा अनुवाद वाचण्यासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या व्यक्तीला पाचारण करून त्याच्या तोंडून अनुवादीत भाग वाचला जातो. मात्र राज्यपालांचे अनुवादीत अभिभाषण वाचण्यासाठी बोलविण्यात आलेल्या श्रीराम केळकर ऐवजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी वाचन केल्याने अनुवाद वाचणाऱ्या …

Read More »

मे २०१८ पर्यंत १५ हजार गावे दुष्काळ मुक्त करणार राज्यपाल सी.विद्यासागर राव यांचा दावा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून आगामी मे २०१८ पर्यंत राज्यातील आणखी १५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याचा दावा राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी केला. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या निमित्ताने दोन्ही सभागृहाच्या सदस्यांसमोर अभिभाषण करताना …

Read More »

आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाची माफी मागितली राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठीत अनुवाद न वाचल्याने विरोधकांची टीका

मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाच्या प्रथेप्रमाणे राज्यपालांचे इतर भाषेत असलेल्या भाषणाचा मराठीत अनुवाद वाचून दाखविण्यात येतो. मात्र यंदा पहिल्यांदाच राज्यपालांच्या भाषणाचा अनुवाद वाचण्यास अनुवादक नसल्याने राज्य सरकारवर नामुष्की ओढावली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे ही बाब गंभीर असल्याचे सांगत सभागृहाची माफी …

Read More »

राज्य सरकारच्या निषेधार्थ राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल सी.विद्यासागर यांच्या अभिभाषणा दरम्यान राज्य सरकारच्या कारभाराच्या निषेधार्थ विरोधकांनी घोषणाबाजी केली. तसेच हे सरकार घोषणांच्या नावाखाली जनतेला गाजर देत असून सरकारवर निष्क्रीयतेचा आरोप करत विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला. विधिमंडळ अधिवेशनाच्या प्रथेप्रमाणे राज्यपालांचे अभिभाषण दोन्ही सभागृहाच्या संयुक्त सभागृहाच्या सदस्यांसमोर होत असते. …

Read More »