Marathi e-Batmya

बिच्चारे अजित पवार, “इकडून धक्का, तिकडून धक्का देतोस का रे” म्हणण्याची पाळी

लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत मध्य प्रदेशातील भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकर्ता संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटी रूपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करत सुप्रिया सुळे यांना मत देणे म्हणजे शरद पवार यांच्या घराणेशाहीला मत अशी टीका केली. त्यानंतर पुढील काही दिवसातच राष्ट्रवादीत नाराजी नामा घडत अजित पवार यांच्यासह ४३ आमदार शिवसेना स्टाईलने शरद पवार यांच्यापासून वेगळे होते महाराष्ट्रातील सत्तेत सहभागी झाले. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अजित पवार यांचे स्वागत करत योग्य ठिकाणी आलात पण उशीर केलात असे कौतुकोद्गारही काढले.

या गोष्टीला जवळपास एक वर्ष पूर्ण झाला. नंतरच्या दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणूक झाली. या निवडणूकीत अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघात पराभूत झाल्या. आणि ७ पैकी फक्त सुनिल तटकरे हे रायगड मतदारसंघातून निवडूण आले. त्यावेळी अजित पवार यांना सोबत घेतल्यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. त्याचा फटका जास्तीचा भाजपाला बसला. त्यावरून भाजपाच्या वैचारिकतेचा प्रसार करणाऱ्या विवेक साप्ताहिकाने अजित पवार यांच्याबाबत जाहिर लेख लिहून भाजपातील नाराजीला वाट मोकळी करून दिली. तसेच मध्यंतरीच्या काळात शिवसेना शिंदे गटाच्या काही आमदारांनी तर अजित पवार यांच्याबद्दल जाहिर वक्तव्य करत महायुतीतील सहभागावरून प्रत्यक्ष टीका केली.

त्यानंतर नुकतेच एका प्रसारमाध्यमाच्या कार्यक्रमात बोलताना महायुतीचे जनक तथा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि त्याच्या पक्षाकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल बोलताना म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या खराब कामगिरीचे कारण म्हणजे राष्ट्रवादीची मते मित्रपक्षांना हस्तांतरित होण्यात अपयश हा एक मुद्दा मांडत भाजपा-शिवसेना शिंदे गटाची मते अजित पवार यांच्या पक्षाला मिळाली. मात्र अजित पवार यांच्या पक्षाची मते भाजपाला मिळाली नसल्याचे सांगत एकप्रकारे अजित पवार आणि त्यांच्या पक्षावर अविश्वास दाखविला.

त्या वेळी, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते म्हणाले: “आरएसएसच्या कोणत्याही मुखपत्रात व्यक्त केलेली मते भाजपा किंवा त्यांच्या नेत्यांची मानसिकता दर्शवत नाहीत नसल्याचे सांगत सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला.

तर गुरुवारी फडणवीस म्हणाले, “राजकारणात तुम्हाला अनेकदा परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची सक्ती केली जाते. राष्ट्रवादीशी युती केल्याने पक्षाला शंभर टक्के मान्यता मिळाली नाही, पण आम्ही ८० टक्के लोकांना पटवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत याचा अर्थ भाजपा राष्ट्रवादीशी संबंध तोडेल का, यावर फडणवीसांचे पुन्हा उत्तर होकारार्थी नव्हते. “झालेली घटना दुरुस्त करण्यासाठी वेळ नाही,” असे स्पष्ट करत “म्हणून, आपल्याला त्याच मार्गावर पुढे जावे लागेल.” असे सांगितले.

तर अजित पवार यांनी अलीकडच्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबतच राहील यावर वारंवार जोर दिला असताना, भाजपाकडून त्रिपक्षीय युतीचे तिसरे चाक असल्याचे सूचविण्याची वेळ यापेक्षा वाईट असू शकत नाही. निवडणुका अगदी जवळ आल्याने आणि लोकसभेच्या एका जागेच्या निकालानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला अधिकच धोका निर्माण झाला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीला म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस सरकार आणि महायुती दोन्हीमध्ये आमचा भागीदार आहे. आम्ही त्यांची कदर करतो. लोकसभा निवडणुकीनंतर, आम्ही तळागाळात अधिक समन्वय सुनिश्चित करण्यासाठी काम केले असल्याचे सांगितले.

शिवसेनेच्या विपरीत, भाजपा महाराष्ट्रात परंपरागतपणे राष्ट्रवादीचा प्रतिस्पर्धी आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत, २८८ जागांपैकी ५४ जागांवर भाजपाने अविभाजित NCP (काँग्रेसचा मित्रपक्ष) विरुद्ध सामना केला होता. २४ मतदारसंघात राष्ट्रवादीचा विजय झाला असून त्यातील १८ जागांवरील आमदार आता अजित पवार यांच्यासोबत आहेत.

भाजपा नेत्यांच्या या पावित्र्यामुळे आणि शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या भूमिकेमुळे अजित पवार यांना आता इकडून धक्का-तिकडून धक्का देतोस का रे असे म्हणण्याची पाळी आणली आहे. त्यामुळे एकतर धक्के खा नाही तर भाजपासोबतच्या महायुतीतून बाहेर पडा असा पर्यात भाजपानेच अजित पवार यांना उपलब्ध करून दिला आहे.

Exit mobile version