Breaking News

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, आरएसएस संविधान विरोधी बंदी हटविण्यावरून आरएसएसवर साधला निशाणा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्णपणे भारताला धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून स्वीकारतो का आणि त्यांना भारताचा राष्ट्रध्वज मान्य आहे का, ते भारतीय संविधानाशी एकनिष्ठ आहेत का? असे सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा आणि आरएसएस RSS यांच्यावर निशाणा साधत विचारला.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर कळाले असेल. उत्तर नाही आहे. आरएसएस RSS धर्मनिरपेक्ष भारतविरोधी आहे, आरएसएस RSS तिरंगाविरोधी आहे, आरएसएस RSS संविधान विरोधी आहे.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एखादा सरकारी कर्मचारी आरएसएस RSS आणि त्यांच्या विभाजनवादी विचारसरणीशी एकनिष्ठ असेल तर तो भारताशी एकनिष्ठ कसा असू शकतो ? असा सवालही यावेळी केला.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *