Breaking News

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आदिवासी आपल्या हक्कांसाठी एकत्र नागपुरात ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घेतली भेट

राज्यातील आदिवासी संघटना आता सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर एकत्रित येत आहेत. आदिवासी भागांत जिथे आदिवासी मोठ्या प्रमाणात राहतात तिथे ९० टक्के खनिज संपत्ती आहे. त्याचा उपयोग नॉन आदिवासी समूह करत आहेत अशा विविध प्रश्नांवर ते एकत्रीत येत आहेत.

डॉ रमेश गजभिये ( माना जमात आदिम मंडळ, मुंबई), हरिष उईके ( सचिव, गोंडवाना गणतंत्र पार्टी), गजानन गोदरू पाटील जुमनके ( माजी नगराध्यक्ष, गो ग पा), डॉ निरंजन मसराम ( अध्यक्ष, गोंडवाना संग्राम पार्टी), शंकर कोहचडे ( राष्ट्रीय महासचिव, गोगपा), सुनीलभाऊ गायकवाड ( राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय आदिवासी पार्टी), वसंतभाऊ अहिरे ( राज्य कोशाध्यक्ष, भारतीय आदिवासी पार्टी), भगवान भोंडे ( आदिवासी गोवारी समाज युवा शक्ती संघ, भंडारा जिल्हा अध्यक्ष), अरविंद सांदेकर ( माना समाज समन्वय समिती) विकास कुडमथे ( अध्यक्ष, आदिवासी विद्यार्थी कृती समिती), सरला चचाने (आदिवासी गोवारी समाज युवा शक्ती संघ), सुभेदार मेजर माधव टेकाम ( आदिम कोलाम जमात संघटना), प्रा. हितेश मडावी, महबूबभाई शेख ( गोगपा) या संघटना एकत्रीत आल्या आहेत.

या संघटना अनेक पक्षांकडे या संदर्भात जाऊन आल्या होत्या, मात्र, त्यांची कोणत्याही पक्षाने दखल घेतली नाही आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट या पक्ष आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी नागपूर येथील रवी भवन येथे घेतली. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक मुद्द्यावर लढण्यासाठी आता आदिवासी आणि आदिवासींच्या संघटना, राजकीय पक्ष जागृत होऊन आता एकत्रित येत आहेत.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून राज्यातील ओबीसींमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर जागृती निर्माण केली. आता आदिवासी संघटना यांनीही प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली, त्यामुळे राज्यातील राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल का ? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Check Also

अतुल लोंढे यांचा सवाल, ‘हिट अँड रन’ प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलावर कारवाई का नाही? पोलिसांवर दबाव कोणाचा ? कायदा आणि सुव्यवस्था सत्ताधारी भाजपाच्या दावणीला

भारतीय जनता पक्ष युती सरकारच्या काळात सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार व त्यांच्या नातेवाईकांना कायद्याचा धाकच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *