Breaking News

प्रविण दरेकर यांची टीका, खुनशी कोण हे महाराष्ट्राला दिसून आलेय संजय राऊतच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या घोड्यावर बसवतायत

तुम्ही एवढे मोठे आंदोलन उभे करत असताना खुन्नस काय असतो हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले असते. लोकशाही मार्गाने ते आंदोलन करायला देताहेत. सुडाची भावना असती तर ते तसे वागले असते. परंतु ते लोकशाही मार्गाला मानणारे आहेत. तुम्हीच आंदोलनाआडून किती खूनशी आहात हे महाराष्ट्र पाहतोय. सर्वांना अरेतुरे करता. त्यामुळे खूनशी कोण आहे हे तुमच्या प्रत्येक वाक्यावाक्यात महाराष्ट्राला दिसून येतेय, अशी टीका भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली.

पत्रकारांशी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, राजकारणात कोण येत असते, कोण जात असते. परंतु मनोज जरांगे आपण काळजी घ्या की, आपल्या आंदोलनात पहिल्या दिवसापासून असणारी लोकं आपल्या सोबत आहेत का? मला अनेक जण भेटले. येणाऱ्या काळात तुमच्यापासून किती लोकं बाहेर पडतील त्याची मोजदादही करता येणार नाही, याची काळजी घ्या. देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची काळजी घेऊ नका. महाराष्ट्रातील जनता त्यासाठी सक्षम आहे.

तसेच जरांगे मराठा आरक्षण विषयापासून दूर गेलेत. त्यांचा राजकीय पक्ष होतोय. ते पक्ष काढतील किंवा अपक्ष राहतील, कुठल्यातरी पक्षाला पाठिंबा देतील. त्यामुळे ज्यांना तिकीट मिळणार नाही, पक्षापेक्षा जे उमेदवारीला महत्व देतात असे लोकं भेटत असतात. आता त्यांना एक नवीन राजकीय दुकानं मिळालेय त्या दुकानात जातील, असा टोलाही प्रविण दरेकरांनी लगावला.

प्रविण दरेकर पुढे म्हणाले की, लाडक्या बहिणींनी विरोधकांची त्रेधातिरपट उडवली आहे. जेजे बोलताहेत ते तोंडावर आपटताना दिसताहेत. त्यांच्या वक्तव्याचे उत्तर आमचे महायुती सरकार देतेय त्यामुळे ह्यांची थोबाडं काळी होताना दिसताहेत. राऊत म्हणतात आमचे सरकार आल्यावर दीड हजाराचे तीन हजार करणार. तुम्ही काय जादू करणार की आकशातून पैसे आणणार आहात. बजेटमध्ये वर्षभराची तरतूद केली असल्याचे आम्ही सांगितले. आमचे सरकार बहाद्दर आहे. एक महिन्याचे नाही दोन महिन्याचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात टाकले. विरोधक तोंडावर आपटताहेत. उलट राज्याचे मुख्यमंत्री आज म्हणाले आपला आशीर्वाद लाभला आणि ही योजना चिरंतर टीकावी असे वाटत असेल तर दीडचे दोन, दोनचे तीन हजार करू. पुढची शाश्वती आमचे सरकार देतेय. त्यामुळे खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.

संजय राऊत यांच्यावर टीका करताना प्रविण दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांची वर्तणुकच दर्टी आहे हे महाराष्ट्राने पाहिले आहे. राजकारणापेक्षा आपले चारित्र्य घाणेरडे नसावे याची काळजी घेणे आवश्यक आहे. महाविकास आघाडीतील नेते रोज हास्यास्पद वक्तव्य करताहेत. त्यामुळे त्यांना हासीराम कोतवाल म्हटले पाहिजे. होय आम्ही घाशीराम आहोत. आम्ही काम करणारे, घासणारे आहोत. आम्ही गोरगरिबांच्या वेदना दूर करण्यासाठी रात्रं दिवस घासतोय. आम्ही घासणारे राम आहोत.

अनिल देशमुख यांच्या विधानावर बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, ज्यांची दृष्टिच निवडणुकीने भ्रष्ट झालेली आहे. निवडणुकीशी प्रत्येक गोष्ट जोडण्याचे काम त्यांचे आहे. त्यामुळे दुसरं नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी आमची हिंदुत्ववादी जनता, वारकरी आहेत त्यांनाच दंगलखोर ठरवणे हा हिंदुत्वप्रेमी जनतेचा अपमान आहे.

प्रविण दरेकर म्हणाले की, उद्धव ठाकरे भाषणं करत असताना संजय राऊत शरद पवार यांच्याशी हितगुज करण्यात मग्न असतील. त्यामुळे ठाकरेंचे भाषणं त्यांनी ऐकले नसेल. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या घोड्यावर चढवण्यात संजय राऊतच उतावीळ होते. त्यासाठी दिल्लीला घेऊनही गेले होते. दिल्लीसमोर हात जोडले, विनवण्या केल्या परंतु दिल्लीने उभे केले नाही. मग स्वतःच मी मोठेपणा दाखवतोय, महाराष्ट्राच्या हिताचा मीच विचार करतोय अशा प्रकारचा टेम्बा मिरवण्याचे काम उद्धव ठाकरे करताहेत त्यातून संजय राऊत यांची इज्जत गेल्याची टीका केली.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *