Marathi e-Batmya

सरन्यायाधीशांच्या घरी गणपती पूजनावरील टीकेला पंतप्रधान मोदींचे उत्तर

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या घरी गणपती पूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले. त्यावरून पंतप्रधान मोदी आणि सरन्यायाधीश यांच्यावर सर्वचस्तरातून टीका करण्यात आली. त्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी उत्तर देत म्हणाले की, गणेश पूजेसाठी मी सहभागी झाल्यामुळे काँग्रेसकडून टीका करण्यात येत असल्याचे सांगितले.

भुवनेश्वरमध्ये मंगळवारी एका मेळाव्यात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, मी गणेश पूजेत सहभागी झाल्यामुळे काँग्रेस आणि त्यांच्या वातावरणातील लोक कसे खवळले आहेत ते तुम्ही पाहू शकता. काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात “या लोकांनी गणपतीची मूर्ती तुरुंगात टाकली असा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, समाजात ‘विष पसरवण्याची’ अशी मानसिकता देशासाठी घातक आहे. आम्ही अशा द्वेषपूर्ण शक्तींना पुढे जाऊ देऊ नये. आम्हाला आणखी बरेच टप्पे गाठायचे आहेत, असेही यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी ओडिशा सरकारच्यातीने सुभद्रा योजनेचा शुमारंभ केला. या योजनेंतर्गत, पंतप्रधानांनी २५ लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात ५,००० रुपयांची आर्थिक मदत हस्तांतरित करत या योजनेचा शुमारंभ केला.

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे स्मरण करून पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात गणेश उत्सवाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सत्तेच्या भुकेने इंग्रजांनी देशाची फाळणी करून जातीच्या नावावर मारामारी केली आणि समाजात विष पसरवले. फूट पाडा आणि राज्य करा हे इंग्रजांचे धोरण होते. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाचे आयोजन करून भारताचा आत्मा जागृत केला होता, असेही यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपला धर्म आपल्याला सर्व गोष्टींपेक्षा एक राहण्याची शिकवण देतो. गणेश उत्सव हे त्याचेच लक्षण राहिले. आजही गणेशोत्सव असला की सगळेच त्यात सामील होतात. यात कोणतीही विषमता किंवा मतभेद नाहीत. संपूर्ण समाज एका शक्तीसारखा उभा असल्याचे सांगितले.

Exit mobile version