Breaking News

शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीची प्रस्तावित कामे तातडीने करा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आदेश

शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीची प्रस्तावित कामे तातडीने करण्याचे आदेश राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. मुंबईत शासकीय निवासस्थानी या वसाहतीच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी शिर्डीतील औद्योगिक वसाहतीच्या कामाचा विविध विभागाकडून सखोल आढावा घेतला.

शेती महामंडळाच्या वतीने ५०० एकर जमीन औद्योगिक महामंडळाला विनाशुल्क देण्यात आली आहे. यामुळे या जागे संदर्भातील सर्व सोपस्कार महामंडळाने तातडीने पार पाडून उद्योजकांना तातडीने जमीन वाटप करण्यात करता यावी यासाठी आवश्यक असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी दिले. सदर बैठकीला उद्योग मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी संतोष भिसे, मुंबईचे भूमी व्यवस्थापक बप्पा थोरात, पुणे एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अभियंता, उपवनसंरक्षक अधिकारी नगर, गोदावरी प्रकल्प कार्यकारी अभियंता,कार्यकारी अभियंता महावितरण तथा इतर विभागीय अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील यांनी या वसाहतीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या पाणी, रस्ते, वीज या सुविधांचा आढावा घेत. या सुविधांसाठी आवश्यक त्या परवानग्या तातडीने देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी उद्योजकांना जागेची पाहणी करता यावी यासाठी साफ सफाई करून घ्यावी आणि जागेवर फलक लावून घेण्याच्या सूचना दिल्या. त्याच बरोबर रस्त्यांची आखणी करून घेण्याचेही त्यांनी सांगितले.
सदर वसाहतीमुळे नगर, शिर्डी, तसेच आसपासच्या तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून येणाऱ्या काळात शिर्डी धार्मिक क्षेत्राबरोबर राज्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र म्हणून नावारूपाला येईल असा आत्मविश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *