Breaking News

कोलकाता येथील आंदोलनाला हिंसक वळण, नबन्नाकडे जाण्याचा प्रयत्न आरजी कार रूग्णालयातील घटनेवरून आंदोलन

कोलकाता पोलिसांनी मंगळवारी आंदोलकांचे फोटो जारी केले असून या हिंसक आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला आणि आदल्या दिवशी हिंसाचार केला. आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्समधून आत घुसून पश्चिम बंगाल सचिवालय ‘नबन्ना’ कडे मोर्चा वळविण्याचा प्रयत्न केला. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याच्या मागणी करत होते.

तृणमूल काँग्रेसचे (TMC) कुणाल घोष यांनी दावा केला की, पश्चिम बंगालमधील आजच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार करणारे आणि पोलिसांवर हल्ला करणारे आंदोलक हे विद्यार्थी नव्हते. आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर दगडफेकही केली, परंतु पोलिसांनी गोळीबार केला नसल्याचे सांगितले.

पुढे बोलताना कुणाल घोष म्हणाले की, ते विद्यार्थी नव्हते आणि त्यांची न्यायाची मूळ मागणी ही आमची मागणी आहे. तेथे मोठा मेळावा नव्हता, तिथे जास्तीत जास्त ३००० लोक होते. ते बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न करत होते, पोलिसांवर हल्ले करत होते, दगडफेक करत होते. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी किमान कारवाई केली नसल्याचा आरोपही यावेळी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केला.

डॉक्टरांच्या कथित बलात्कार आणि हत्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मंगळवारी राज्य सचिवालय नबन्नाकडे निघालेल्या मोर्चादरम्यान कोलकाता पोलिसांबरोबर झालेल्या धुमचक्री झाली. पोलिसांवर दगडफेक आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या १०३ पुरुष आणि २३ महिलांसह तब्बल १२६ आंदोलकांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.

शहरात झालेल्या हिंसक चकमकीत १५ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहितीही पुढे आली असून नबन्नाकडे निघालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार, अश्रुधुराचा आणि पाण्याच्या वापर केला.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *