Breaking News

पुण्याचे काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांचे पोलिस ठाण्याच्या आवारातच धरणे आंदोलन

लोकसभा निवडणूकीसाठी ४ थ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात उद्या १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मात्र प्रथेनुसार प्रत्येक सत्ताधारी पक्षाकडून निवडणूकीच्या आदल्या रात्री मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रलोभने दाखविण्यात येतात. याच प्रलोभनाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एम टॉनिकचा वापर करण्यात येतो. पुण्यातील काँग्रेसचे आमदार तथा लोकसभेचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी पैसे वाटप करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर कारवाई करा या मागणीसाठी पोलिस स्थानकात ठिय्या आंदोलन सुरु केल्याचे वृत्त हाती आले आहे.

सोमवारी १३ मे रोजी चवथ्या टप्प्यातील लोकसभेसाठी मतदान पार पडत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे काही कार्यकर्त्ये सहकारनगर मधील झोपडपट्टीमध्ये पैसे वाटप करत असल्याची तक्रार घेऊन आमदार रविंद्र धंगेकर यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात आले. मात्र पोलिसांनी सदर पैसे वाटणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कारवाई करण्यास चालढकल सुरु केली. त्यामुळे रविंद्र धंगेकर यांनी थेट पोलिस ठाण्याच्या आवारातच ठिय्या मारून धरणे आंदोलन सुरु केले.

यावेळी काही पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे आंदोलन करू नये यासाठी रविंद्र धंगेकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र रविंद्र धंगेकर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करत मतदारांना पैशाचे प्रलोभन दाखविणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांच्यावर कारवाई करा अशी मगच ठिय्या आंदोलन बंद करतो असा पवित्रा घेतला.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *